Home ठळक बातम्या कल्याण सायकलिस्ट फाउंडेशनच्या ‘माउंटन बाईकींग’ स्पर्धेला उत्स्फर्त प्रतिसाद

कल्याण सायकलिस्ट फाउंडेशनच्या ‘माउंटन बाईकींग’ स्पर्धेला उत्स्फर्त प्रतिसाद

देशभरातील अनेक राष्ट्रीय खेळाडूंचाही सहभाग

कल्याण दि.२७ जून :
एकीकडे पावसाळी वातावरण…डोंगरावर पसरलेली हिरवाईची चादर आणि अशा प्रफुल्ल वातावरणात डोंगर कड्यावर रंगलेला सायकलिंगचा थरार. निमित्त होते ते कल्याण सायकलिस्ट फाउंडेशनने कल्याणजवळील निसर्गरम्य अशा रायते गावात आयोजित माऊंटन बाइकिंग स्पर्धेचे. देशाच्या विविध राज्यातील अनेक खेळाडूंसह राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे दिग्गज सायकलपटू ही स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यावेळी इंडीयन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

कोवीडमुळे गेली दोन वर्ष ही स्पर्धा होऊ शकली नाही. मात्र परिस्थिती आता सुधारत असल्याने कल्याण सायकलिस्ट फाउंडेशनने यंदाच्या स्पर्धेसाठी जय्यत तयारी केली होती. कल्याणसह मुंबई, राजस्थान, आसाम, बंगळुरू, गोवा आदी राज्यातील 75 स्पर्धक सहभागी झाले होते. ज्यामध्ये राष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या काही दिग्गज खेळाडूंचाही समावेश होता. 11 वर्षाखालील, सोळा वर्षाखालील, पुरुष गट, इन्ड्युरो स्टेज फुल सस्पेन्शन आणि हार्ड ट्रेल अशा पाच गटात ही स्पर्धा घेण्यात आली.

माऊंटन बाइकिंग एक साहसी खेळ म्हणून जगभरात ओळखला जातो त्याचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या उद्देशाने कल्याण सायकलिस्ट फाउंडेशन गेल्या ७ वर्षांपासून कार्यरत आहे. ज्या गोष्टी आपण मुंबईत किंवा देशाच्या इतर भागात करतो त्या सगळ्या गोष्टी कल्याण परिसरात पण आपण आणू शकतो आणि त्या अनुषंगाने आम्ही कल्याण सायकलिस्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरुवात केल्याची माहिती संस्थापक डॉ. अद्वैत जाधव यांनी दिली. ज्यामध्ये रोड सायकलिंग, माउंटन बाईकिंग, महिला सायकलिंग आणि ज्युनिअर सायकलिंग आदी उपक्रम राबवत असतो. संपूर्ण देशभरात आम्ही १२ हजार तर कल्याण परिसरातून दिड ते दोन हजार सायकलिस्ट एकत्र असल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले. तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे स्वामिनाथन अय्यर, सतीश द्विवेदी यांच्यासह अनेक सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

दरम्यान स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कल्याण सायकलिस्ट फाऊंडेशनतर्फे रायते गावातील ७५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

रायते माउंटन बाईकिंग स्पर्धेतील गटनिहाय विजेते…

पुरुष गट
विठ्ठल भोसले
अनुप पवार
सतीश कुमार
सुधांशू वर्मा

११ वर्षांखालील गट
आरव जिवानी
जाज्वल्य सुर्यवंशी
पार्थ झोपे

१६ वर्षांखालील गट
स्वराज गावडे
सर्वेश मोरे
ओम खर्चे

इंड्यूरो फुल सास्पेशन
आर्णव
विरेंद्र
प्रद्युम्न

इंड्यूरो हार्ड ट्रेल
वरुण दत्त
कशिश कदम
कपिल

 

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा