Home ठळक बातम्या 7 ह प्रभाग क्षेत्रातील रस्ता रुंदीकरणात बाधित गाळ्यांवर केडीएमसीची कारवाई

7 ह प्रभाग क्षेत्रातील रस्ता रुंदीकरणात बाधित गाळ्यांवर केडीएमसीची कारवाई

 

डोंबिवली दि.17 जून :
डोंबिवलीच्या 7 ह प्रभाग क्षेत्रातील प्रभाग क्षेत्रातील रस्ता रुंदीकरणात बाधित गाळ्यांवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी कारवाई केली.

ह प्रभागक्षेत्र परिसरातील नवापाडा येथील वीर जिजामाता भोसले मार्गाच्या रुंदीकरणात हे गाळे बाधित होत होते. या बाधित 11 गाळयांवर निष्कासनाची कारवाई केल्याची माहिती प्रमोद पाटील यांनी दिली. ही कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, विष्णूनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने आणि 1 जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा