Home ठळक बातम्या झाड अंगावर पडून आई आणि मुलगा जखमी ; कल्याण पश्चिमेच्या ठाणगेवाडीतील घटना

झाड अंगावर पडून आई आणि मुलगा जखमी ; कल्याण पश्चिमेच्या ठाणगेवाडीतील घटना

 

कल्याण दि. १६ जून :
रस्त्यावरुन जात असताना अचानक झाड कोसळून त्यामध्ये आई आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. कल्याण पश्चिमेच्या ठाणगेवाडी परिसरात ही घटना घडली असून जखमी आई आणि मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याण पश्चिमेच्या बिर्ला कॉलेज परिसरात राहणारी ही महिला त्यांच्या मुलाला भाविकला शाळेतून आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी शाळेतून मुलाला घेऊन येत असताना ठाणगेवाडी परिसरात असणारे भलेमोठे झाड अचानक अंगावर कोसळले. ज्यामधे हे दोघेही जखमी झाले. स्थानिक नागरीकांनी झाड बाजूला करुन दोघांना बाहेर काढत आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. या घटनेत भाविकच्या पायाला दुखापत झाली असून सुनिता यांनाही मार लागला असल्याचे समजते.

दरम्यान कोसळण्याच्या स्थितीत असलेली रस्त्याच्या शेजारील झाडे पावसाळ्यात मोठी दुर्घटना होण्यापूर्वी हटवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा