Home ठळक बातम्या कल्याणात गाडीसह कार पार्किंगची लिफ्ट कोसळली ; ३ जण जखमी तर गाडीचे...

कल्याणात गाडीसह कार पार्किंगची लिफ्ट कोसळली ; ३ जण जखमी तर गाडीचे नुकसान

 

कल्याण दि. ६ जून :
बहुमजली इमारतीमधील कार पार्किंग लिफ्ट टेस्टिंग सुरू असताना अचानक गाडीसह कोसळल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेला घडली. या अपघातात गाडीमधील ३ कामगार जखमी झाले आहेत. (Car parking elevator collapses in Kalyan; 3 injured and vehicle damaged)

कल्याण पश्चिमेच्या देवी अहिल्याबाई चौकात ही 23 मजली टोलेजंग इमारत आहे. या इमारतीमध्ये चार मजली कार पार्किंग उभारण्यात आले आहे. याच कार पार्किंगमधील लिफ्टची आज सायंकाळी टेस्टिंग सुरू होती. ३ कामगार ही टेस्टिंग करत होते. तळ मजल्यावर लिफ्टमध्ये गाडी चढवून ही लिफ्ट वर जात असताना अचानक ती खाली कोसळली. ज्यामध्ये या टेस्टिंगमध्ये सहभागी असणारे ३ कामगार जखमी झाले असून सुदैवाने त्यांचा जीव बचावला आहे. अचानक झालेल्या या घटनेने सोसायटीमध्ये एकच गडबड गोंधळ उडाला. तर घटनेची माहिती मिळताच केडीएमसी अग्निशमन दल आणि पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा