Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर

 

एकूण 44 प्रभागातून 133 सदस्य येणार निवडून

कल्याण डोंबिवली दि.13 मे :
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी महापालिका निवडणुकींबाबत महत्वाचे आदेश दिले होते. त्यानुसार आज कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या निवडणूक विभागातर्फे अंतिम प्रभाग रचना अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये एकूण 44 प्रभागांतून 133 लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. (Final ward composition of Kalyan Dombivali Municipal Corporation election announced)

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आणि नकाशे 1 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले होते. मात्र ओबीसी वर्गाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभमीवर महविकास आघाडी सरकारने अध्यादेश काढत मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबतचे अधिकार आपल्या हातात घेतले. मात्र काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने कल्याण डोंबिवलीसह मुदत संपलेल्या सर्व महापालिकांना 17 मे पर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज केडीएमसी प्रशासनाकडून ही अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. (LNN)

अशी आहे केडीएमसीची अंतिम प्रभाग रचना…

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आज जाहीर झालेल्या वॉर्ड रचनेसाठी 2011च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला असला तरी आतापर्यंत झालेली लोकसंख्येतील नैसर्गिक वाढही त्यात गृहीत धरण्यात आली आहे. आज जाहीर झालेल्या या अंतिम प्रभाग रचनेत एकूण 133 प्रभाग असून 44 पॅनलमध्ये ते विभागण्यात आले आहेत.

तर 44 पैकी पहिले 43 पॅनलमध्ये 3 उमेदवार तर शेवटच्या म्हणजेच 44 व्या पॅनेलमध्ये 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असतील.(LNN)

एकूण 133 सदस्य या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येणार आहेत. त्यापैकी 67 जागा महिलांसाठी असतील.

तर एकूण सदस्य संख्येपैकी अनुसूचित जातींसाठी 13 जागा राखीव असून त्यापैकी अनुसूचित जातींच्या महिलासाठी 7 जागा राखीव आहेत.(LNN)

अनुसूचित जमातीसाठी 4 जागा असून त्यापैकी 02 जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव आहेत.

सर्वसाधारण (खुल्या) जागा 116 असून त्यापैकी 58 जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत.(LNN)

दरम्यान प्रभाग रचनेबाबत एकूण 997 हरकतींपैकी 375 हरकती मान्य करण्यात आल्या असून त्यानुसार प्रभाग क्रमांक 28, 29 , 32, 37 , 42 आणि 43 या प्रभगांच्या सीमांमध्ये बदल करण्यात आल्याचेही केडीएमसी उपआयुक्त सुधाकर जगताप यांनी सांगितले आहे.

महापालिका सार्वत्रिक निवडणूकीची ही अंतिम प्रभाग रचना www.kadmcelection.com या वेबसाइटवर उपलब्ध असल्याची माहिती पालिका निवडणूक विभगाचे उपआयुक्त सुधाकर जगताप यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा