खा. डॉ. श्रीकांत शिंदेंच्या मागणीला यश
नवी दिल्ली दि.२९ एप्रिल :
शुक्रवारी मध्य रेल्वेच्या भायखळा स्थानकात एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना एसी लोकलचे भाडे सुमारे 50 टक्क्यांनी कमी केले जाईल अशी घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. त्यामुळे एसी लोकलसाठी आता प्रति पाच किलोमीटरसाठी आकारले जाणारे 60 रूपये भाड्याऐवजी अवघे 30 रूपये द्यावे लागणार आहेत. एसी लोकलचे प्रवासी वाढवायचे असल्यास भाड्यात कपात करण्याची मागणी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यामुळे प्रति ५ किलोमीटर प्रवासासाठी ६० रूपयांऐवजी ३० रूपये द्यावे लागणार आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या एसी लोकलमुळे प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार अशी आशा असताना या प्रवासासाठी अवाच्या सव्वा भाडे द्यावे लागत असल्याने रेल्वे प्रवाशांनी या प्रवासाकडे पाठ फिरवली होती. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारितील रेल्वे संबंधित अनुदान मागणी संदर्भातील चर्चेमध्ये सहभाग घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे विषयक प्रवाशांच्या मागण्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. यात प्रामुख्याने एसी लोकलच्या भाडे आकारणीचा विषय आग्रहाने मांडला होता.
एसी लोकलचे भाडे या मार्गावर सेकंड क्लास रेल्वे प्रवासाच्या १० पटीने तर फस्ट क्लासपेक्षा दुप्पट जास्त भाडे आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे भाडे परवडणारे नसल्याचे सांगत पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांचा खऱ्या अर्थाने दैनंदिन प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना काहीच फायदा होत नाही असे निरिक्षण खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत नोंदवले होते त्यामुळे या मार्गावर जास्तीत जास्त फेऱ्या या नॉन एसी लोकल रेल्वे सेवेच्या सुरू कराव्यात किंवा एसी लोकल रेल्वे सेवेचे भाडे कमी करावे अशी आग्रही मागणी डॉ. शिंदे यांनी त्यावेळी केली होती. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत प्रत्यक्षही त्यांना याबाबतची विनंती खा. डॉ. शिंदे यांनी केली होती.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या या घोषणेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वागत केले असून प्रवाशांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल दानवे यांचे आभार मानले आहेत. लवकरच सर्वसामान्य प्रवाशांना कमी दरात एसी लोकलचा गारेगार प्रवास करता येणार आ