कल्याण दि. २५ एप्रिल :
कल्याण पूर्व आणि पश्चिममधील विविध भागांमध्ये आज पोलिसांनी ‘रूट मार्च’ काढल्याचे दिसून आले. २८ पोलीस अधिकारी, १७५ ठाणे अंमलदार, पोलिसांची ३५ वाहने आणि विविध तुकड्या यामध्ये सहभागी झाले होते.
या रूट मार्चमध्ये पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांसह क्यूआरटी (क्वीक रिस्पॉन्स व्हॅन), एसआरपीएफ (राज्य राखीव पोलिस दल) च्या तुकडीसह अग्निशमन दलही सहभागी झाले होते. दुर्गाडी चौकातून काढण्यात आलेला पोलिसांचा हा रूट मार्च बारदान गल्ली ते शिवाजी चौकापर्यंत काढण्यात आला.
सहाय्यक पोलिस आयुक्त माने पाटील यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात पोलिसांना दोन वर्षे 18 ते 24 तास डय़ूटी करावी लागली. कोरोना काळात फिजीकल अॅक्टीव्हीटी नव्हती. आत्ता कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे सगळे सण-उत्सव आणि जयंत्या जल्लोषात साजऱ्या केल्या जात आहेत. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस बंदोवस्त नेमण्याचे काम सुरु झाले असून पोलिसांची फिजीकल अॅक्टीव्हीटी राखण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आल्याचे एसीपी उमेश माने पाटील यांनी सांगितले.