Home ठळक बातम्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवरील कारवाईच्या मागणीसाठी कल्याणातही ब्राह्मण महासंघाचे पोलिसांना निवेदन

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवरील कारवाईच्या मागणीसाठी कल्याणातही ब्राह्मण महासंघाचे पोलिसांना निवेदन

 

कल्याण दि.21 एप्रिल :
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीतील सभेत केलेल्या वक्तव्याचे कल्याणातही पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे कल्याणात बाजारपेठ पोलिसांना निवेदन देण्यात आले.

आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणात परंपरागत हिंदू विवाह पद्धतीतील ‘ कन्यादाना’ संस्कारावर गलिच्छ आणि द्वेषमूलक टिका केल्याचे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे या निवेदनात म्हटले आहे. तसेच मिटकरी यांनी या संस्काराच्या विधींवर, पुरोहितांवर खोटी, बेताल टिका करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याने त्यांच्यावर गुन्हा करावा आणि योग्य ती कारवाई करण्याची मागणीही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा