Home ठळक बातम्या ढगाळ वातावरणातही कल्याण डोंबिवलीचा पारा पोहोचला 42 अंशांजवळ

ढगाळ वातावरणातही कल्याण डोंबिवलीचा पारा पोहोचला 42 अंशांजवळ

 

कल्याण- डोंबिवली दि.21 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीतील तापमानाचा पारा आज पुन्हा एकदा 42 अंशाच्या जवळ गेलेला पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ढगाळ वातावरण असूनही तापमान चाळीशी पार पोहचल्यामूळे निर्माण झालेल्या असह्य उकाड्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.अवघ्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा कल्याणात आज पुन्हा एकदा 41.9 अंश सेल्सिअस आणि डोंबिवलीत 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.

मार्च महिन्याच्या अखेरीस कल्याण डोंबवलीतील तापमानाचे सर्व विक्रम मोडीत निघाले होते. त्यापाठोपाठ यंदाच्या एप्रिलमध्ये तर अवघ्या आठवड्याच्या कालावधीत तापमानामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. आज तर कल्याण डोंबिवलीत काही ठिकाणी पावसाचे शिंतोडेही पडले. त्यामुळे एकीकडे ढगाळ वातावरण आणि दुसरीकडे असह्य उकाडा असे विरोधाभासी चित्र दिसून आले.

 

उत्तरेकडून येणारे वारे आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ढगाळ वातावरण असूनही असह्य उकाडा – हवामान अभ्यासक अभिजीत मोडक

उत्तरेकडून येणारे कोरडे वारे आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ढगाळ वातावरण असूनही तापमानात मोठी वाढ झालेली दिसत असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जमिनीपासून 4.5 किलोमीटर वरती ढगाळ वातावरण आणि पावसाचे शिंतोडे पण त्याचवेळी जमिनीवर कोरडी गरम हवा उतरत असल्याने तापमान सतत चाळिशी पार करत आहे. आणि हवेतील आर्द्रता 20 टक्क्यापर्यंत खाली आल्याची माहितीही अभिजीत मोडक यांनी दिली.

आजचे तापमान

कल्याण – 41.9

डोंबिवली – 41.7

भिवंडी – 41.9

उल्हानगर – 41.7

ठाणे – 41.2

बदलापूर – 41.3

नवी मुंबई – 40.8

पलावा – 42.5

कोपरखैरणे – 41.5

कर्जत – 43.5

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा