Home ठळक बातम्या बदलापूर- अंबरनाथदरम्यान एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड- कल्याण स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी

बदलापूर- अंबरनाथदरम्यान एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड- कल्याण स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी

 

कल्याण दि.30 मार्च :
लातूरहून मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस इंजिनात बिघाड झाल्याने अंबरनाथ बदलापूर ते कल्याण दरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. याचा फटका सकाळीस कामावर जाणाऱ्या हजारो प्रवाशांना बसला असून या एक्सप्रेस बिघाडामुळे कल्याण स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

आज सकाळच्या सुमारास लातूरहून मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बदलापूर -अंबरनाथ दरम्यान वाहतूक खोळंबली. परिणामी कर्जतहून अंबरनाथ बदलापूर आणि कल्याणकडे येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेसच हा प्रकार घडल्याने अंबरनाथ बदलापूरसह कल्याण स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. कल्याण स्टेशनवर तर प्रवाशांनी जीव धोक्यात घालून विरुद्ध दिशेने लोकल पकडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. दरम्यान या तांत्रिक बिघाड आनंतर रेल्वे प्रशासनाने इंजिन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा