Home ठळक बातम्या आमच्या नेत्याबद्दल चुकीचे कोणी करत असल्यास जशास तसे उत्तर देऊ – भाजप...

आमच्या नेत्याबद्दल चुकीचे कोणी करत असल्यास जशास तसे उत्तर देऊ – भाजप आमदार रविंद्र चव्हाण

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या नोटीशीची होळी

डोंबिवली दि.13 मार्च :
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीविरोधात राज्यभरात भाजप आक्रमक झाली आहे. राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणे डोंबिवलीतही भाजपने आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. ‘आमच्या नेत्याबद्दल मनामध्ये ठेऊन कोणी चुकीचे काही करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिला.

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलीसांनी नोटीस दिल्यानंतर डोंबिवलीमध्येही भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेले पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीशीच्या प्रतींची होळी करून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात आपला निषेध नोंदवला. तसेच यावेळी महाविकास सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

तर आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या भ्रष्टाचाराविरोधातील पुराव्यांमुळे महाविकास आघाडीचे सरकार घाबरले गेले असून त्या परिस्थितीतच त्यांनी ही नोटीस देण्याचे काम केले आहे. त्याला फडणवीस अजिबात भीक घालत नसून विरोधकांना हे सरकार कशाप्रकारे अडचणीत आणण्याचे काम करत आहे हे त्यांनी विधानसभेत पेनड्राईव्हच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे याचा निषेध करून आमच्या नेत्याबद्दल मनामध्ये ठेऊन कोणी चुकीचे काही करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा थेट इशाराच आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा