सहभागी नागरिकांना मोफत चष्मे आणि औषधांचेही वाटप
कल्याण दि.7 मार्च :
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवासेनेचे महाराष्ट्र सहसचिव योगेश निमसे यांच्या पुढाकाराने आयोजित या आरोग्य शिबिरामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
या शिबिराच्या माध्यमातून अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, 2 डी इको, व्हॉल रिप्लेसमेंट, फ्रॅक्चर, जॉईंट डिसलोकेशन, एस.एल रिपेअर आणि प्रोस्टेट आदी शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार असल्याची माहिती युवासेना सहसचिव आणि आयोजक योगेश निमसे यांनी दिली. तर आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सामान्य चाचणी, मधुमेह, ईसीजी, रक्तदाब, डोळे, पल्स, ऑक्सिजन लेव्हल यासारख्या महत्वपूर्ण आरोग्य चाचण्या करण्यात आल्याचेही निमसे यांनी सांगितले. तसेच यावेळी शिबिरात सहभागी नागरिकांना मोफत चष्मे आणि औषधांचेही वाटप करण्यात आले.
या एकदिवसीय आरोग्य शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला.