Home ठळक बातम्या डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला ; आरोपींना तात्काळ अटक करण्याची आमदार चव्हाण...

डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला ; आरोपींना तात्काळ अटक करण्याची आमदार चव्हाण यांची मागणी

 

डोंबिवली दि.28 फेब्रुवारी :
डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्यावर आज प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. मनोज कटके असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून ते भाजपच्या सोशल मिडीया सेलचे प्रभारी आहेत. दरम्यान या घटनेनंतर याप्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.

मनोज कटके हे आज सकाळी त्यांच्या दुकानात बसले होते. त्यावेळी काही अज्ञात इसम आले आणि कटके यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण केल्याचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. हा अत्यंत भ्याड हल्ला असून तो का केलाय याचा पोलीस तपास करतीलच. मात्र पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना लवकरात लवकर पकडले पाहीजे. अन्यथा भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्ह्याकडून काय केले पाहिजे याचा योग्य तो विचार केला जाईल अशी संतप्त प्रतिक्रीयाही आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. सध्या सध्या मनोज कटके यांच्यावर डोंबिवलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा