अवघड असा सुळका अवघ्या काही तासांत केला सर
कल्याण दि.19 फेब्रुवारी :
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तर कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर या साहसी गिर्यारोहकांच्या गटातर्फे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांना अनोखी साहसी मानवंदना दिलेली पाहायला मिळाले.
जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ल्यासमोर असलेला वानरलिंगी सुळखा ज्याची उंची ही पायथ्यापासून सुमारे ४८० फूट उंच आहे असा हा सुळखा केवळ काही तासांच्या आत सर करून सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरच्या साहसी गिर्यारोहकांनि छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना वाहिली. वानरलिंगीच्या पायथ्याची उंची जमिनीपासून ही सुमारे ३ हजार फुटांच्या आसपास आहे.
जंगलातून वाट काढत, वन्य प्राण्यांच्या वावरात नाणेघाटाच्या टोकावरून सूळख्याच्या पायथ्याकडे सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गिर्यारोहकांनी कूच केले. त्यानंतर १ तासाभरात पायथ्याशी पोहचल्यानंतर सर्व प्रथम मानवंदना म्हणून सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. आरती झाल्यावर गिर्यारोहकांनी सुळखा सर करण्यासाठी दोरखंड बांधायला घेतले. हे दोरखंड बांधत असतांना लहानशी चुकीची शिक्षाही 3 हजार फूट दरीत कोसळून मृत्यू हीच. त्यामुळे सह्याद्रीच्या या अनुभवी गिर्यारोहकांच्या पथकाने आपल्या तंत्रशुद्ध पध्दतीने गिर्यारोहण पूर्ण करून सूळख्याचा कळस गाठत शिवरायांना साहसी शिवरायांना मानवंदना वाहिली. तब्बल ४८० फुटांचा हा सुळका सर करण्यासाठी सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरच्या गिर्यारोहकांना केवळ ३ तासांचा वेळ लागला.
या मोहिमेत पवन घुगे, रणजित भोसले,दर्शन देशमुख, भूषण पवार, अक्षय जमदरे, कल्पेश बनोटे, प्रशिल अंबाडे, प्रतीक अंबाडे, नितेश पाटील, महेंद्र भांडे, सचिन पाटील आदी साहसी गिर्यारोहक सहभागी झाले होते.