Home ठळक बातम्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत बदलापूरच्या सुरज अकॅडमीने पटकावले विजेतेपद

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत बदलापूरच्या सुरज अकॅडमीने पटकावले विजेतेपद

 

कल्याण दि.1 नोव्हेंबर :
तायक्वांदो असोसिएशन महाराष्ट्राच्या मान्यतेने आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ ठाणे जिल्हाअंतर्गत झालेल्या स्वर्गीय दिलीप कपोते फाऊंडेशन आणि तायक्वांदो असोसिएशन कल्याणच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 20 व्या जिल्हास्तरीय सिनियर तायक्वांदो स्पर्धेत बदलापूरच्या सुरज तायकांदो अकॅडमीने विजेतेपद पटकावले. तर स्पार्टन्स अकादमीने उपविजेतेपद पटकावले आणि ओम साई अकॅडमीला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यामधील 200 खेळाडूंनी सहभागी होत चांगला प्रतिसाद दिला. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू पालघरला होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय तायकांदो स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती ताईक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष संदीप ओंबासे यांनी दिली.

या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी प्रदेश काँग्रेस महासचिव ब्रिज दत्त, सरचिटणीस चिटणीस प्रकाश मुथा, ताईक्वांदो अध्यक्ष संदीप ओंबासे हे उपस्थित होते. तर पारितोषिक वितरण समारंभासाठी युवासेना जिल्हाधिकारी दिपेश म्हात्रे, शिवसेना संपर्कप्रमुख रवी कपोते, भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल सचिव अनिल पंडित, तायक्वांदो असोसिएशनचे सचिव रोहित जाधव, आयोजक कौशिक गरवालिया, स्वर्गीय दिलीप कपोते फाऊन्डेशनच्या अध्यक्षा कल्पना कपोते, जिल्हा पदाधिकारी रविंद्र गजरे, आनंद पष्टे, दीपक मालुसरे, सुरेन्द्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा