कल्याण दि.28 जून :
कोरोना आणि त्यापाठोपाठ आलेल्या लॉकडाऊनमूळे समाजातील अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत डम्पिंग ग्राऊंडजवळील साठेनगर वस्तीत असणाऱ्या लोकांची अवस्था तर अजूनच बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणातील इनर्व्हिल क्लब रिव्हरसाईडतर्फे साठेनगर वस्तीतील मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली.
शालेय किट आणि साहित्यासह जीवनावश्यक वस्तूंचीही यावेळी मदत करण्यात आली. इथल्या मुलांसाठी काम करणाऱ्या अनुबंध या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून इनर्व्हिल क्लब रिव्हरसाईडतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी इनर्व्हिल क्लबच्या अध्यक्षा मीनल पोटे, सचिव कुंजल हराई यांच्यासह शर्मिला शहा, खुशबू नागडा, रुपाली दारंगे, जस्मिन शहा आदी सदस्यही सहभागी झाले होते.