Home कोरोना भाजप कार्यकर्त्यांवर बंगालमध्ये होणाऱ्या हल्ल्याविरोधात कल्याण डोंबिवलीत भाजपची निदर्शने

भाजप कार्यकर्त्यांवर बंगालमध्ये होणाऱ्या हल्ल्याविरोधात कल्याण डोंबिवलीत भाजपची निदर्शने

 

कल्याण-डोंबिवली दि. 5 मे :
निवडणूकीनंतर पश्चिम बंगालमजध्ये भाजप कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कल्याण डोंबिवलीमध्ये आज निदर्शने करण्यात आली. कल्याण पश्चिमेला माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी ही निदर्शने केली.

देशभरात गाजलेल्या पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा धुरळा अद्याप खाली बसलेलाही नाही. तोच तिकडे मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. या हल्ल्याच्या घटनांचा निषेध करण्यासह आणि तिकडील भाजप कार्यकर्त्यांना पाठींबा दर्शवण्यासाठी आज ठिक ठिकाणी ही निदर्शने करण्यात आली.
ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीपूर्वी ‘खेला हो बे’ची जाहीर घोषणा केली होती. त्यानूसार बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर तिकडे हल्ले सुरू झाले असून त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना आपला पाठींबा दर्शवण्यासाठी ही निदर्शने केल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा