Home कोरोना भारतीय जनता युवा मोर्चा, व्योम संस्था आणि भारत विकास परिषद आयोजित ‘प्लाझ्मादान’...

भारतीय जनता युवा मोर्चा, व्योम संस्था आणि भारत विकास परिषद आयोजित ‘प्लाझ्मादान’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

डोंबिवली दि.28 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीत सध्या वाढते कोरोना रुग्ण आणि त्यापाठोपाठ प्लाझ्माचीही मोठी गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा,कल्याण जिल्ह्याच्या माध्यमातून डोंबिवलीतील व्योम संस्था आणि भारत विकास परिषद डोंबिवली शाखेच्या सहकार्याने आयोजित प्लाझ्मादान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डोंबिवलीतील प्लाझ्मा ब्लड बँकेमध्ये हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. (Spontaneous response to ‘Plasmadan’ camp organized by Bharatiya Janata Yuva Morcha, Vyom Sanstha and Bharat Vikas Parishad)

भारत मातेचे पूजन करून या शिबाराची सुरुवात करण्यात आली. कोरोना बाधितांची कल्याण डोंबिवलीची संख्या हजाराच्या पार जाऊ लागली आहे. रुग्णाला हॉस्पिटलात प्रवेश मिळणे अवघड, इंजेक्शन्स आणि औषधांसाठी देखील वणवण करावी लागते आहे. अशा परिस्थितीत प्लाझ्मादाता मिळणे तर त्याहून अवघड झाले आहे. लोकांचा हा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई यांनी दिली. वयोगट २० ते ५५ वर्षै, कोविड लस न घेतलेला, रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास नसलेला, कोवीड आजारातून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर साधारण 30 ते 90 दिवसांच्या कालावधी प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

डोंबिवलीमधील स्वामी विवेकानंद सेवा मंडळ, व्योम संस्था, भारत विकास परिषद आणि भारतीय जनता युवा मोर्चा एकत्रित येऊन, प्लाझ्मा दान विषयात डाटा बेस तयार करणे, प्लाझ्मा दान करू शकतील अशा युवकांचे समुपदेशन करणे, त्यांना प्लाझा डोनेशनसाठी प्रवृत्त करणे या स्वरूपाचे काम सुरू होणार आहे.
1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांसाठी लसीकरण चालू होणार आहे. त्या आधी जास्तीत जास्त युवकांनी पुढाकार घेऊन रक्तदान आणि प्लाझ्मा दान करण्याचे आवाहनही या सामाजिक संस्थांतर्फे करण्यात आले.

यावेळी भाजयुमो श्रीमलंग मंडळाचे अध्यक्ष, उपसरपंच समीर भंडारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्लाझ्मा दान केले. तर भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष परेश गुजरे ह्यांच्या हस्ते प्लाझ्मादात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
भाजयुमो कल्याण जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई, भाजपा श्रीमलंग मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र वारे, व्योम संस्था संस्थापक अध्यक्ष चिन्मय कामतेकर, भारत विकास परिषद डोंबिवली शाखा सचिव अभिजित मराठे, श्रीगणेश मंदिर संस्थानचे प्रविण दुधे, प्लाझ्मा ब्लड बँकेचे चारू बोरगावकर, नीलम शहा, अर्पिता दिघे, भाजयुमोचे अमेय गोखले, अपूर्व कदम, अमित देवस्थळी, विजय कोनार, विनीत फाटक, रतन पुजारी, अथर्व खांडगे, व्योम संस्थेचे आकांक्षा मेहंदळे, गौरी डेंगळे, विनीत जठार, वैद्य अमृता वेलणकर, मयुरी शेवडे, रूपक अभ्यंकर आदींनी या सामाजिक उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा