Home कोरोना कोवीड लस संपल्याने कल्याण डोंबिवलीत नागरिकांचा संताप; 30 पैकी 24 लसीकरण केंद्र...

कोवीड लस संपल्याने कल्याण डोंबिवलीत नागरिकांचा संताप; 30 पैकी 24 लसीकरण केंद्र लसीआभावी बंद

 

कल्याण डोंबिवली दि.23 एप्रिल :
वाढत्या कोवीड रुग्णसंख्येमूळे आधीच आरोग्य सुविधा घेण्यासाठी झगडणाऱ्या कल्याण डोंबिवलीकरांची ससेहोलपट काही थांबताना दिसत नाहीये. कोवीड लसींचा साठा संपल्याने कल्याण डोंबिवलीतील 30 पैकी तब्बल 24 केंद्र नाईलाजाने आज बंद ठेवावी लागली. परिणामी लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना लस न घेताच परतावे लागल्याने लोकांनी मोठा संताप व्यक्त केलेला पाहायला मिळाला. (Outrage of citizens in Kalyan Dombivali over end of Covid vaccine; 24 out of 30 vaccination centers closed due to lack of vaccines)

गेल्यावर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेली कल्याण डोंबिवली ही शहरं पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाच्या पूर्वीपेक्षा अधिक अशा संकटात सापडली आहेत. दररोज हजारांनी वाढत जाणाऱ्या कोवीड रुग्णांपुढे सध्याची उपलब्ध आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. कोवीड रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केडीएमसी प्रशासन आपल्या परीने शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत कोवीड रुग्ण असो की केडीएमसी प्रशासन यांच्यासाठी कोवीड लस हाच एक आशेचा किरण आहे. मात्र भल्यामोठ्या लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध होणाऱ्या अत्यल्प लसी म्हणजे एकप्रकारे फाटलेल्या आकाशाला ठिगळं लावण्याचेच काम.
या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत आज अनेक कोवीड लसीकरण केंद्र लसींचा साठा संपल्याने नाईलाजाने बंद ठेवावी लागली. कल्याण डोंबिवलीत सध्याच्या घडीला 30 केडीएमसी आणि खासगी मिळून 30 ठिकाणी लसीकरण केले जाते. मात्र आज लस संपल्यामूळे आज यातील केवळ 6 केंद्रच सुरू असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. परिणामी अनेक केंद्रांवर सकाळपासून रांग लावून उभ्या असणाऱ्या अनेक नागरिकांना लसीआभावी रिकाम्या हातानेच परतावे लागले. ज्यामुळे नागरिकांनी शासकीय यंत्रणा आणि राजकारण्यांविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. निवडणुकीत मते मागण्यासाठी आमच्या घरापर्यंत येतात मग लसीसाठी आम्हाला एवढा त्रास का सहन करावा लागतो? घरी येऊन ही लस का दिली जात नाही असे अनेक संतप्त सवाल या नागरिकांनी व्यक्त केले.

दरम्यान लसीकरणासंदर्भात महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 30 पैकी 24 केंद्र लसीच्या साठ्याअभावी बंद असल्याचे ते म्हणाले. तसेच आज संध्याकाळपर्यंत शासनाकडून सुमारे साडे पाच हजार लसींचा साठा उपलब्ध होण्याची शक्यताही डॉ. निंबाळकर यांनी एलएनएनशी बोलताना वर्तवली.

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा