Home ठळक बातम्या २७ गावांचा पाणीपुरवठा तात्काळ नियमित करा अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासणार – मनसेचा...

२७ गावांचा पाणीपुरवठा तात्काळ नियमित करा अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासणार – मनसेचा इशारा

 

डोंबिवली दि. 25 मार्च :
कल्याण ग्रामीणमधील २७ गावातील तीव्र पाणी टंचाईबाबत डोंबिवली मनसेतर्फे एमआयडीसी कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच 27 गावांतील पाणीपुरवठा तात्काळ नियमित न झाल्यास होळीच्या दिवशी अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा डोंबिवली शहर मनसेतर्फे देण्यात आला आहे.
27 गावांतील पाणी पुरवठ्याबाबत आमदार राजू पाटील यांनीही ट्विट करत हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. त्याचजोडीला मनसे पदाधिकाऱ्यांनी काल एमआयडीसी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना पाणी पुरवठयाबाबत कडक शब्दांत समज दिली. (Regularize water supply to 27 villages immediately, otherwise the face the heat – MNS warning=)

फेब्रुवारीपर्यंत सुरळीत असणारा पाणीपुरवठा अचानक मार्चपासुन अनियमित का झाला ? मुख्य जलवाहिनीवरील प्रेशर कमी का ठेवले जाते ? क.डों.म.पा. पाणी खाते आणि एमआयडीसी अधिकारी वर्गाच्या बैठका का होत नाहीत? टँकर माफियांमुळे कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येतोय का ? नियमीत पाणी बील भरुनही लोकांवर अन्याय का ? यासारख्या अनेक प्रश्नांची यावेळी अधिकाऱ्यांवर सरबत्ती करण्यात आली.

 

तर एमआयडीसी कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांच्याकडुन या प्रश्नांची योग्य उत्तरे न मिळाल्याने मनसैनिकांसह नागरिकही आणखी संतप्त झाले. हा पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास येणाऱ्या होळीला अधिकारी वर्गाचे तोंड काळे करु असा इशारा यावेळी देण्यात ल्याचे मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी सांगितले. तसेच यावेळी प्रतिकात्मक निषेध म्हणुन काळ्या रंगाचा डबा अधिकाऱ्यांना भेट देण्यात आला. हा विषय कायमचा मार्गी लावण्यासाठी मनसेतर्फे लवकरच एमआयडीसी आणि केडीएमसी पाणीपुरवठा विभागाची संयुक्त बैठक घेण्यात येईल अशी माहिती शहराध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी दिली.

यावेळी मनविसे शहराध्यक्ष मिलींद म्हात्रे, शहरसंघटक हरीश पाटील, ओम लोके, रविंद्र गरुड, संजय सरमळकर यांच्यासह देशमुख होम्समधील वंदना सोनावणे,अमरसेन चव्हाण आदी स्थानिक रहिवासीही उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा