Home ठळक बातम्या कल्याण पूर्वेतील महत्वाच्या लोकग्राम पादचारी पुलाच्या पाडकामास सुरुवात

कल्याण पूर्वेतील महत्वाच्या लोकग्राम पादचारी पुलाच्या पाडकामास सुरुवात

 

कल्याण दि.6 मार्च :
कल्याण पूर्वेच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोकग्राम पादचारी पुलाच्या पाडकामास सुरुवात( demolition work of lok gram railway fob started) झाली आहे. कल्याण स्टेशनवरून लोकग्राम परिसरात जाण्यासाठी हजारो नागरिक या पुलाचा वापर करत असायचे. मात्र धोकादायक झाल्याने हा पादचारी पूल रहदारीचा बंद करण्यात आला होता. अखेर आजपासून त्याच्या पाडकामास सुरुवात झाली आहे.

या पूलाचे काम लवकर मार्गी लागावे यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (mp dr. Shrikant shinde) यांनी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यासंदर्भात रेल्वे प्रशासनासोबत अनेक वेळेस बैठका घेऊन त्यांनी हे काम युद्धपातळीवर होण्यासाठी स्वतः जातीने लक्ष देत आहेत. रेल्वेने जुन्या लोकग्राम पादचारी पुलाच्या पाडकाम करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यास अखेर सुरुवात झाली असून जून महिन्याच्या शेवटपर्यंत हे पाडकाम पूर्णत्वास नेण्याचे प्रस्तावित असून त्यानंतर लगेचच नवीन पुलाच्या बांधकामास सुरुवार होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्याचबरोबर पाडकाम संपण्याच्या आधीच पादचारी पूलाच्या बांधकामाची निविदाही रेल्वेकडून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे हे पाडकाम संपताच नव्या पादचारी पुलाच्या बांधकामाची निविदाप्रक्रिया पुढील महिन्यात पूर्ण करून नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नविन पुलाच्या बांधकामासाठी कोणताही अडथळा आणि विलंब होणार नाही असे खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा