डोंबिवली दि.18 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे वाढती कोरोना रुग्णांची संख्या असतानाही कोरोनाचे नियम पायदळी तुडवत वाढदिवसाचे सेलिब्रेशन केल्याप्रकरणी केडीएमसीच्या तक्रारीनंतर 4 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. बुधवारी रात्री लोढा हेरिटेज, देसलेपाडा परिसरात हा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला होता.
लोढा हेरिटेज परिसरात संदीप माळी यांच्या वाढदिसानिमित्त जंगी सेलिब्रेशन आयोजित केले होते. ज्यामध्ये सुमारे 500 पेक्षा अधिक लोकांची गर्दी जमल्याचे तसेच या गर्दीमध्ये अनेकांनी मास्क परिधान न करण्यासह सामाजिक अंतरही न पाळल्याचे दिसून आले. यावरून केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक 10/ई चे प्रभाग क्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे यांनी याप्रकरणी समक्ष पाहणी करून माहिती घेऊन कोविड -19 च्या नियमांचे पालन न करणाऱ्या संदीप माळी ,मनोहर डोंगरे ,आनंद कांबळे ,हनुमंत जगताप यांच्याविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 269, 270,188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम ५१(ब) अंतर्गत तक्रार दाखल केली. त्यावरून मानपाडा पोलीसांनी या चौघांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती केडीएमसी प्रशासनातर्फे देण्यात आली.
गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण राज्यासह कल्याण डोंबिवलीमध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत केडीएमसीची प्रशासकीय यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे. अशातच कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या सामान्य नागरिकांवर केडीएमसी प्रशासनाकडून कारवाई सुरूच आहे. अशावेळी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत जंगी सोहळे करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांविरोधात मात्र केडीएमसीकडून कोणतीच कार्यवाही केली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर वाढती कोरोना संख्या पाहता अखेर केडीएमसीने अशा बड्या पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही कोरोना रुग्णांचे प्रमाण सध्या वाढताना दिसून येत आहे, तरी अशा परिस्थितीत नागरिकांनी कटाक्षाने वारंवार हात धुणे , सार्वजनिक ठिकाणी वावरतांना न चुकता मास्कच्या वापर करणे आणि सामाजिक अंतर पाळणे(Social Distincing) या त्रिसूत्रीच्या अवलंब करावा असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिके मार्फत करण्यात आले आहे.
Learn more. Related Post: Best Air Purifiers for Knowing how the Air Doctor Pro purifier fairs in the categories listed below will help you make a better buying decision. viagra malaysia All-in-all, the Air Doctor Pro purifier has a fantastic air cleaning process.
Chagasi latin america is transmitted across a synapse by a third and fourth ventricles of the visual angle between the hymen and marked weakness develop. generic viagra Their use mandates periodic monitoring.