कल्याण-डोंबिवली दि.17 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सुरू असणाऱ्या तसेच प्रस्तावित विविध नागरी विकासकामांचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दालनात झालेल्या मॅरेथॉन बैठकीत विकासकामांना गती देऊन लवकरात लवकर ती पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक विकासकामे अंतिम टप्प्यात आली असून काही विकासकामांना नुकतीच सुरुवात झाली आहे. अशा सर्व कामांची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माहिती घेतली. तब्बल 4 तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीमध्ये उल्हास नदी, बीएसयूपी प्रकल्प, कल्याण पूर्वेतील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, सॅटीस प्रकल्प आदी महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच अंतिम टप्प्यात आलेल्या विकासकामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस मनपा आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, माजी महापौर विनिता राणे, माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, विधानसभा संघटक अरविंद मोरे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, महेश गायकवाड, निलेश शिंदे, राजेश कदम, परिवहन सभापती मनोज चौधरी उपस्थित होते.
या प्रमूख मुद्द्यांवर झाली चर्चा…
- उल्हास नदीतील प्रदुषण रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्यासह नदीमध्ये निर्माण झालेली जलपर्णी तातडीने साफ करणे.
- बीएसयूपी योजनेत ज्या लाभार्थींना अद्याप घरे मिळाली नाहीत, त्यांना लवकरात लवकर घर देण्याबाबत…
- कल्याण पूर्व येथिल प्रस्तावित डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावा…
- महापालिकेच्या रुग्णालयात अल्प दरात डायलेसीस सुविधा देण्यासाठी डायलेसीस सेंटर उभारणी…
- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या कल्याण सॅटीस प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियांसंदर्भात..
- कल्याण रिंगरूट प्रकल्पाच्या सुरु असलेल्या कामाचा आढावा घेत काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना..
- भोपर नांदिवली मोठागाव येथील डीएफसीसी प्रकल्पासंदर्भात चर्चा
- डोंबिवलीतील मच्छी मार्केट, बोरा समाजासाठी दफन भूमी जागा उपलब्ध करून देणे यासंदर्भात