Home ठळक बातम्या कल्याण पूर्वेच्या मलंगगड ते उल्हासनगर 100 फूट रस्त्यात बाधित घरं तोडण्याची कारवाई

कल्याण पूर्वेच्या मलंगगड ते उल्हासनगर 100 फूट रस्त्यात बाधित घरं तोडण्याची कारवाई

 

कल्याण दि.11 फेब्रुवारी :

कल्याण पूर्वेतील मलंगगड रोड ते उल्हासनगरपर्यंत रस्त्यात बाधित बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली. या रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणारी एकुण 42 बांधकामे यावेळी तोडण्यात आली. ही कारवाई करतांना बाधित बांधकामधारकांनी सहकार्य केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

या रस्त्याची लांबी 2.4 किमी असून रुंदी 30 मीटर(100 फूट) असून तो पूना-लिंक रस्त्याला समांतर रस्ता आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर पूना -लिंक रस्त्यावरील वाहतूक कमी होऊन वाहतुक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार आणि विभागीय उपआयुक्त (ड प्रभाग) अनंत कदम यांचे मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 5/ड प्रभाग क्षेत्र परिसरात प्रभागक्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे, उप अभियंता प्रशांत भुजबळ यांनी 5/ड आणि 4/जे प्रभागातील अतिक्रमण विरोधी पथकामार्फत ही कारवाई केली. तर महापालिकेच्या 9/आयच्या पिसवली परिसरातही प्रभागक्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांनी आय प्रभागातील अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिस पथकाच्या सहाय्याने काल दिवसभरात 10 बांधीव जोते आणि 8 रुम निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा