मुंबई दि.2 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला हादऱ्यांवर हादरे बसत असून उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून 24 तासही उलटत नाहीत तोच मनसेचे अभ्यासू नेतृत्व अशी ओळख असणारे मंदार हळबे यांनीही मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. मंदार हळबे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमूख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आधी राजेश कदम आणि आता मंदार हळबे यांनीही मनसेला जय महाराष्ट्र केल्याने कल्याण डोंबिवलीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मनसेचे एक आक्रमक आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून मंदार हळबे यांची ओळख आहे. त्यांनी केडीएमसीमध्ये विरोधी पक्षनेते आणि गटनेते या पदांवर काम करताना आपल्या अभ्यासू कामाची छाप सोडली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हळबे यांनी भाजपविरोधात निवडणूकही लढवली होती.
दरम्यान कालच मनसे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. त्याला काही तासही उलटत नाहीत तोच हळबे यांनी मनसेला आणखी एक धक्का दिला आहे.
Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला आणखी एक धक्का; गटनेते मंदार हळबे यांचा भाजपमध्ये प्रवेश