
453 शाळांचा निकाल 100 टक्के
ठाणे दि.27 मे :
आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल तब्बल 95 टक्क्यांहून अधिक लागला असून यंदाही पुन्हा एकदा मुलींनी यामध्ये बाजी मारली आहे.
दहावी परीक्षेत ठाणे जिल्ह्यातून तब्बल 1 लाख 13 हजार 403 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1 लाख 8 हजार 378 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ज्यामध्ये मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.39 टक्के तर मुलींचे प्रमाण 96.79 टक्के इतके आहे. तर यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा निकाल ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 97.45 टक्के लागला आहे.
ठाणे जिल्ह्यातील दहावी निकालाची आकडेवारी…
कल्याण ग्रामीण – 96.31 टक्के
अंबरनाथ – 96.08
भिवंडी – 94.46
मुरबाड – 94.40
शहापूर – 96.65
ठाणे – 95.21
नवी मुंबई – 97.45
भाईंदर – 96.96
कल्याण डोंबिवली – 95.86
उल्हासनगर – 93.84
भिवंडी – 92.08