Home ठळक बातम्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील 9 तलावांचे होणार संवर्धन – सुशोभीकरण

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील 9 तलावांचे होणार संवर्धन – सुशोभीकरण

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

भिवंडी दि.१ सप्टेंबर :
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील 9 तलावांच्या संवर्धन आणि सुशोभिकरण प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांनी राज्य सरोवर संवर्धन विकास योजनेतून या तलावांच्या विकासकामांना लवकरच सुरूवात होणार आहे.(9 lakes in Bhiwandi Lok Sabha Constituency will be conserved and beautified)

योजनेंतर्गत तलाव परीसरात होतात ही कामे…
राज्याच्या पर्यावरण विभागाकडून राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत तलावांचे पुनरुज्जीवन, प्रदूषण कमी करण्याबरोबर तलाव संवर्धन करण्यासाठीच्या योजनेत या तलावांचा समावेश केला जातो. त्यानुसार तलावाच्या सुशोभिकरणाबरोबरच परिसरात झाडे लावणे, सोलार पथदिवे, बेंचेस, निर्माल्यकलश बसविण्यात येतात.

भिवंडी लोकसभेतील 6 तलावांची निवड…
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील 6 तलावांचा राज्य सरोवर संवर्धन योजनेत समावेश करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. त्यानुसार कल्याण तालुक्यातील उतणे चिंचवली येथील उतणे तलावासाठी 2 कोटी ८८ लाखांचा प्रस्ताव, मुरबाड तालुक्यातील तळवली-बारगाव तलावासाठी 2 कोटी ४४ लाखांचा प्रस्ताव, भिवंडी तालुक्यातील धामणगाव तलावासाठी ३ कोटी ९७ लाखांचा प्रस्ताव, वडपे तलावासाठी ४ कोटी ५५ लाखांचा प्रस्ताव, वाशेरे तलावासाठी ४ कोटी रुपयांचा प्रस्ताव आणि कोन गावातील तलावासाठी 5 कोटी ३९ लाखांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच या तलावांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधीही तातडीने वितरीत करण्यात आला आहे. त्यामुळे या तलावांच्या कामाला लवकरच सुरूवात होईल अशी माहिती केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.

बदलापूर गावातील तलवांसाठीही निधी मंजूर…
या कामांबरोबरच बदलापूर नगरपालिका हद्दीतील बदलापूर गाव तलावासाठी 2 कोटी ३४ लाख, जुवेली गावासाठी 2 कोटी ८५ आणि कात्रप गावासाठी ४ कोटी ५३ असा नगरपालिकेला १० कोटीचा निधीही मंजूर केल्याचे पाटील यांनी सांगितले. तर भिवंडी शहरातील वऱ्हाळदेवी तलावाच्या संवर्धनासाठीचा ५३ कोटी रुपयांचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे.

निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार…
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वऱ्हाळदेवी तलावासह आणखी सहा तलावांच्या संवर्धनासाठी सुमारे ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा