Home ठळक बातम्या मतदान जनजागृतीसाठी कल्याणच्या नूतन महाविद्यालयात 80 फुटांची महारांगोळी

मतदान जनजागृतीसाठी कल्याणच्या नूतन महाविद्यालयात 80 फुटांची महारांगोळी

कल्याण दि.2 मे :
एकीकडे हळूहळू राजकीय प्रचार आता जोर धरू लागला असताना दुसरीकडे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगानेही कंबर कसल्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कल्याण पश्चिमेतील नूतन महाविद्यालयात 80 बाय 80 फुटांची महारांगोळी काढण्यात आली आहे.(80 feet Maharangoli at New College of Kalyan for vote awareness)

काल 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन त्यासोबतच कल्याणच्या शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असलेल्या छत्रपती शिक्षण मंडळाचा ६४ वा वर्धापन दिन. त्यानिमित्ताने कर्णिक रोड येथील नूतन विद्यालयाच्या भव्य पटांगणावर ८० फूट बाय ८० फूट आकाराची महारांगोळी काढण्यात आली होती. मुंबई, ठाणे, कल्याणात येत्या २० मे रोजी लोकसभेचे मतदान होणार असून त्याबाबत जनजागृतीसाठी ही महारांगोळी काढण्यात आली.

शाळेतील कलाशिक्षक श्रीहरी पवळे आणि विद्यार्थी यांनी एकूण 3 तासात ही रांगोळी साकारली. यासाठी 300 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. या उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत तर्टे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे, त्याचबरोबर शालेय समिती सदस्य नेवे सर, माजी शिक्षिका डहाळे मॅडम, ताई कुंटे, शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद, परिवेक्षक संतोष कदम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती वेदपाठक, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दिपाली साबळे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी पालक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा