नवी दिल्ली दि.14 डिसेंबर:
भारतीय संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकसभेत आयोजित केलेल्या विशेष चर्चा सत्रामध्ये शिवसेना पक्षाच्यावतीने संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी अगदी मुद्देसूद आणि आक्रमक भाषण करून विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. दरम्यान खा. शिंदे बोलत असताना मध्येच उठत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी थेट काँग्रेसच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या एका पत्राचा दाखला देत राहूल गांधी यांना कोंडीत पकडले.(75 years of Indian Constitution:Strong wordfight between Mp Dr.Srikant Shinde and congress leader Rahul Gandhi)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने आजवर हा देश चालला, उभा राहिला आणि पुढेही चालत राहील. मात्र संविधान वाचण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसनेच वेळोवेळी संविधानाचा अपमान केला असे यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी निक्षून सांगितले. कधी उच्च न्यायालयाचा निर्णय डावलून तर कधी आणीबाणी लादून संविधान कमकुवत करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसनेच केला. लोकसभा निवडणुकीवेळी तर संविधान हातात घेऊन संविधान धोक्यात असल्याचा फेक नरेटिव्ह ही काँग्रेसने पसरवल्याचा घणाघात खा.डॉ. शिंदे यांनी यावेळी केला.
पाहा संपूर्ण व्हिडिओ 👇👇👇
https://www.facebook.com/share/v/12Ck78AMcf9/
तर ही संविधानाचीच ताकद आहे जिने काँग्रेसला ४०० वरून ४० वर आणले आणि एका गरीब घरातील व्यक्तीला देशाचा पंतप्रधान आणि एका रिक्षावाल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केले, असे ठाम मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देणाऱ्या काँग्रेसचा बाबासाहेबांना सुरवातीपासूनच विरोध होता. यामुळेच त्यांना निवडणुकीत पराभूत करण्याचे काम ही काँग्रेसने केले. मात्र काँग्रेसचा हा फेक चेहरा लोकांनी आता ओळखला आहे. आणि त्याला चपराक लगावण्याचे काम मतपेटीतून केले आहे. त्यामुळे आता कितीही खोटा गाजावाजा केला तरी फरक पडणार नसल्याच्या शब्दांत त्यांनी काँग्रेसवर अतिशय तिखट शब्दांमध्ये टिका केली.