Home ठळक बातम्या कल्याणात 73 वर्षे जूनी अतिधोकादायक इमारत केडीएमसीकडून जमीनदोस्त

कल्याणात 73 वर्षे जूनी अतिधोकादायक इमारत केडीएमसीकडून जमीनदोस्त

 

कल्याण दि.12 ऑगस्ट :
कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील तब्बल 73 वर्षे जुनी इमारत केडीएमसी प्रशासनाने जमीनदोस्त केली आहे. भगवानदास मेंशन असे या इमारतीचे नाव असून ती तळ अधिक तीन मजल्यांची होती.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना स्टेशन रोड परिसरात ई. रविंद्रन यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात केडीएमसीकडून रस्ता रुंदीकरण झाले होते. त्यावेळीही या इमारतीचा अर्ध्याहून अधिक भाग तोडण्यात आला होता. परिणामी अर्धवट तुटलेल्या अवस्थेतील ही इमारत अतिधोकादायक असल्याचे केडीएमसी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. ही इमारत सुमारे ७३ वर्षे जुनी असून सन २०१६ पासून धोकादायक इमारत म्हणून जाहीर झाली होती.

त्यानूसार केडीएमसीचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार क प्रभागक्षेत्र अधिकारी तुषार सोनवणे यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. गुरुवारपासून प्रत्यक्षात मशीनच्या साहाय्याने ही इमारत तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली. तर त्यापूर्वी आठ ते दहा दिवस अगोदर या इमारतीचे स्लॅब तोडण्याचे काम आतून सुरू होते. मात्र शनिवारी पहाटे 3 वाजेपर्यंत ही संपूर्ण इमारत जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती क प्रभाग क्षेत्र अधिकारी तुषार सोनवणे यांनी एलएनएनशी बोलताना दिली.

ही निष्कसनाची कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलीस कर्मचारी, वाहतुक पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ हाय जॉ क्रशर मशीन, १ जे.सी.बी., १ हायड्रा यांच्या सहाय्याने करण्यात आली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा