डोंबिवली दि. 30 जानेवारी :
केडीएमसीतील अभ्यासू नगरसेवक अशी ओळख असलेल्या भाजप पदाधिकारी मंदार हळबे यांनी विविध समाजउपयोगी उपक्रम राबवत आपला पन्नासावा वाढदिवस साजरा केला. डोंबिवलीमधील नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती आणि राज्यकीय नेते मंडळी यांनी हळबे यांना 50व्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
डोंबिवली ते अयोध्या, अशी ऐतिहासिक दौड विक्रमवीर डोंबिवलीकर विशाख कृष्णस्वामी करणार आहे..धावपटू विशाख कृष्णस्वामी 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या दरम्यान दररोज 100 कि.मी. धावणार असून डोंबिवली ते अयोध्या एकूण 1500 की.मी. अंतर धावत पार करणार आहे आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहे.दरम्यान 30 जानेवारी रोजी सकाळी माजी नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी मंदार हळबे यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी धावपटू विशाख कृष्णस्वामीला या ऐतिहासिक दौडसाठी झेंडा दाखवला.
हबळे यांनी वाढदिवसानिम्मित डोंबिवलीत विविध विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले, यात नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते, तसेच कचोरे येथील कुष्ठरोगीसंस्थेतील कुष्ठरोगी बांधवांसाठी मंदार हळबे यांच्या हस्ते घोंगडी वाटप करण्यात आले. तर डोंबिवली पत्रकार कक्षात स्वखर्चातून सीसीटीव्ही बसवले. डोंबिवलीत आदर्श नगर झोपडपट्टी येथे गटार आणि पायवाट पुर्नबांधणी कामाचा शुभारंभही करण्यात आला.