कल्याण-डोंबिवली दि. 7 जून :
कल्याण डोंबिवलीत उद्या (8 जून ) 21 ठिकाणी लसीकरण केले जाणार असून त्यापैकी 3 केंद्रांवर हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्ससह 18 वर्षांवरील नागरिकांनाही कोव्हॅक्सीनचा 2 रा डोस दिला जाणार आहे. तर उर्वरित 18 केंद्रांवर हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्ससह 45 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा 1ला आणि 2 रा डोस दिला जाणार आहे.
उद्या प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र कल्याण (पूर्व) महानगरपालिकेच्या नेतीवली दवाखान्याच्या बाजूला आणि वै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल कोविड लसीकरण केंद्र डोंबिवली (पूर्व) आणि आर्ट गॅलरी, लालचौकी, कल्याण पश्चिम या 3 लसीकरण केंद्रांवर “कोव्हॅक्सीन लसीचा केवळ 2 रा डोस” दिला जाणार आहे. या तीनही ठिकाणी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत हे लसीकरण केलं जाणार आहे.
तर उर्वरित 18 केंद्रांवर उद्या कोविशिल्ड लसीचा 1ला आणि 2 रा डोस दिला जाणार आहे. याठिकाणी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45 वर्षावरील नागरिकांचे सकाळी 10 वाजल्यापासून लससाठा उपलब्ध असेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे.