विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
कल्याण दि.१५ ऑक्टोबर :
राज्यातील सुरू असणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीणमधील २०० उत्तर भारतीयांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. कल्याण ग्रामीणमधील सागाव चिरानगर परिसरातील शेकडो उत्तर भारतीयांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांच्या उपस्थितीत मनसेचा झेंडा हाती घेतला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि मनसे आमदार प्रमोद(राजू) पाटील यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन या उत्तर भारतीयांनी शनिवारी मनसेत जाहीर प्रवेश केल्याची माहिती ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली.
मनसे आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयात किशोर महावर, मनोज सिंग, राजकुमार सिंग, संदीप पांडे, पवन शुक्ला, अजित चौबे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा हा पक्षप्रवेश करण्यात आला.
यावेळी मनसे उप जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील, कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, उप जिल्हा सचिव अनंता म्हात्रे, डोंबिवली शहर संघटक तकदीर काळण, उप शहराध्यक्ष प्रभाकर जाधव, दिवा उप शहरप्रमुख दिनेश पाटील, विभागअध्यक्ष शरद पाटील, रोहित भोईर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कल्याण ग्रामीण भागातील सागांव ,चिरानगर परिसरातील कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्यानंतर आम्ही सर्व जण मनसे पक्ष बांधणीसाठी जोमाने काम करणार असल्याचे यावेळी सांगितले. तर यावेळी त्यांच्या परिसरातील समस्या तातडीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटीबद्ध असेल अशी प्रतिक्रिया मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.