
डोंबिवली दि. 31 जुलै :
कोवीडची लस घेण्याबाबत अजूनही काही लोकांमध्ये मतमतांतरे असताना दुसरीकडे डोंबिवलीत राहणाऱ्या 103 वर्षांच्या अजीबाईंनी कोवीड लस घेतली. कृष्णाबाई महाजन असे या आजींचे नाव असून त्यांनी डोंबिवली येथील केडीएमसीच्या पाटकर लसीकरण केंद्रावर ही लस घेतल्याची माहिती त्यांचे पणतू जयेश अग्निहोत्री यांनी दिली.
त्यामुळे अद्यापही कोवीड लस घेण्यासाठी साशंक असणाऱ्या लोकांसाठी या 103 वर्षांच्या अजीबाईंनी लस घेत एकप्रकारे सकारात्मक संदेश दिला आहे.