Home ठळक बातम्या मनसेच्या माजी नगरसेविकेसह १० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मनसेच्या माजी नगरसेविकेसह १० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

 

कल्याण – डोंबिवली दि. ६ मे :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थताच मनसेच्या कल्याण ग्रामीण माजी नगरसेविकेेसह १० जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी हा प्रवेश करण्यात आला. यावेळी नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.

आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यात आज मनसेमधूनही माजी नगरसेविका पूजा गजानन पाटील यांच्यासह मनसे तालुका प्रमूख गजानन पाटील, मनसे जिल्हा सचिव प्रकाश माने, मनसेचे डोंबिवली शहर संघटक संजीव ताम्हाणे आदी पदाधिकाऱ्यांनीही मनसेला सोडचिठ्ठी देत आपल्या हाती शिवबंधन बांधले.

पक्ष प्रवेशासाठी आमच्यावर कोणाचाही दबाव नाही – गजानन पाटील
शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आमच्यावर कोणताही दबाव नाहीये. कल्याण डोंबिवलीमध्ये जे विकासाचे वारे वाहत आहेत, तो विकास आमच्या प्रभागात व्हावा ही प्रामाणिक इच्छा आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आम्हाला चांगल्याप्रकारे विकास करता येईल म्हणून आम्ही हा प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया गजानन पाटील यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा