Home क्राइम वॉच कल्याणात भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला ; आरोपीला लवकर अटक न झाल्यास...

कल्याणात भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला ; आरोपीला लवकर अटक न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा

कल्याण दि.22 डिसेंबर :
कल्याण पश्चिमेतील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत परांजपे यांच्यावर काल रात्री जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपींना 12 तासांच्या आत अटक न केल्यास शहरामध्ये उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पक्षातर्फे देण्यात आला आहे. (Fatal attack on senior BJP worker in Kalyan; Warning of violent agitation if the accused is not arrested soon)

हेमंत परांजपे हे पारनाका परिसरात उभे असताना स्कुटीवर आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी अचानक त्यांच्यावर हा हल्ला केला. या दोघा हल्लेखोरांनी परांजपे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तसेच रस्त्यावर पडलेले दगडही त्यांच्या अंगावर टाकले. हा सर्व भयानक प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यामुळे कल्याणात एकच खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाचे एकदम कट्टर आणि जुने कार्यकर्ते अशी परांजपे यांची ओळख आहे. त्यामुळे हा हल्ला कोणी केला आणि कोणत्या कारणासाठी केला याबाबत मोठे गूढ निर्माण झाले आहे


आरोपींना 12 तासांत अटक करा अन्यथा उग्र आंदोलन – शहराध्यक्ष वरुण पाटील

दरम्यान या घटनेनंतर कल्याण शहर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून कल्याण पश्चिमेतील भाजप शहर कार्यालयाबाहेर जमत सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परांजपे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

तर पोलिसांनी 12 तासांच्या आत या हल्लेखोरांना अटक केली नाही तर शहरात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी यावेळी दिला आहे. हा हल्ला कोणी केला आणि कोणी करायला लावला याचा तात्काळ तपास करा, हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यावर नव्हे तर भारतीय जनता पक्षावर झाला असल्याचे सांगत वरुण पाटील यांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच भारतीय जनता पक्ष किंवा त्याच्या कार्यकर्त्यांकडे कोणीही तिरक्या नजरेने बघितले तर जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.

पाहा व्हिडिओ 👇👇👇
https://www.instagram.com/share/reel/BBGk1zdaU6

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा