Home ठळक बातम्या नेवाळी आंदोलनाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उचलणार – आमदार गणपत गायकवाड

नेवाळी आंदोलनाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उचलणार – आमदार गणपत गायकवाड

 

कल्याण दि.19 नोव्हेंबर : 
केंद्र पातळीवर गाजलेल्या नेवाळी आंदोलनांचा मुद्दा आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याची माहिती कल्याण पूर्वेतील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नुकताच त्यांनी कल्याणातील पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी नेवाळी आंदोलन, 27 गावं, स्वतंत्र कल्याण जिल्हा, जवळ नियोजन समिती बैठका आदी महत्वाच्या मुद्द्यांवर परखडपणे मतं व्यक्त केली.

कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदार क्षेत्रातील सर्वात मोठं आंदोलन हे नेवाळीमध्ये झाले होते .शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जागा सरकारला द्यायला विरोध केला होता .नेवाळी आंदोलन हे संपूर्ण देशात गाजलं होत त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलणार असून गुन्हे मागे घेण्यसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे .कल्याण पूर्वेतील समस्यादेखील हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.नेवाळी आंदोलनात शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . भीमा – कोरेगाव हिंसाचारात आणि मराठा क्रांती मोर्चातील गुन्हे मागे घेण्यात आले. परंतु नेवाळी मधील शेतकऱ्यांन वरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी अधिवेशनात मांडणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे .

नेत्यांच्या सांगण्यावरून नेवाळी आंदोलन
नेवाळी आंदोलनाने गंभीर रूप धारण केले होते .शेतकऱ्यांनी पोलिसांवर प्रतिउत्तर म्हणून केलेल्या हल्ल्यात सहाय्य्क पोलीस आयुक्तासोबत अनेक अधिकारी जखमी झाले होते . आंदोलनात पोलिसांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक गाड्या ह्या आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्या होत्या. मात्र हे आंदोलन राजकारण्यांच्या सांगण्यावरून नेवाळी आंदोलन केला असल्याचा आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले आहे .

स्वतंत्र कल्याण जिल्ह्याला विरोध…
ठाणे जिल्ह्यातुन पालघर जिल्हा स्वतंत्र झाला परंतु पालघरच्या व तसा विकास झाला नाही .स्वतंत्र कल्याण जिल्हा तयार केल्यास मोठा आर्थिक खर्च येईल . स्वतंत्र जिल्हा स्थापन करून सामान्य माणसाला त्याचा काय फायदा होईल असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे . स्वतंत्र जिल्हा हा राजकारण्यांसाठी असल्याचा टोला भाजपचे आमदार किसन कथोरे याना लगावला आहे .

२७ गावातील दस्तनोंदणी बिल्डरांमुळेच बंद…

कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत . कोणत्याही परवानग्या नघेता अनेक जणांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी केली आहे .विशेष म्हणजे ग्रामपंचायत क्षेत्रात तीन मजल्याची परवानगी असताना बिल्डरांनी पाच आणि सात मजल्यांच्या भल्या मोठ्या इमारती उभ्या केल्या आहेत त्यामुळे महापालिकेला प्रश्न पडला आहे कि आता कोणता मजला तोडायचा ? २७ गावांमध्ये बिल्डरांनी नियम धाब्यावर बसून सर्रास बांधकामे केली आहेत .या परिसराची भविष्यात झोपडपट्टी निर्माण होईल ? आधीच या परिसरात अग्निशमन दलाची वाहने आणि रुग्णवाहिका सुद्धा जाऊ शकत नाही अशी गंभीर परिस्थिती काही भागात निर्माण झाली आहे त्यामुळे दस्त नोंदणी शासनाकडून बंद आहे .या दस्त नोंदणी चालू करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे .

पालकमंत्र्यांनी तेवढंच चांगलं काम केलं आहे …
ठाणे जिल्ह्याचे मा.पालकमंत्री गणेश नाईक हे महिन्याला आमदारांची बैठक घेऊन आढावा घ्यायचे आणि तालुक्याच्या ठिकाणी जनता दरबार घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना काम करायला भाग पाडायचे.।त्यामुळे अधिकाऱ्यांवर वचक होता.परंतु पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याचा विसर पडला असून त्यांनी अशा कोणत्याही बैठका घेतल्या नाहीत. एवढंच नाही तर जिल्हा नियोजन समितीची बैठक दर चार महिन्यांनी होणे आवश्यक असते. परंतु जानेवारी २०१७ पासून एकही बैठक झाली नसल्याने लोकप्रतिनिधींचा अधिकाऱ्यांवर धाक राहिला नाही. पालकमंत्र्यांनी माझ्या मतदारसंघात एकाच चांगलं काम केलं . मांगरूळ मधील तीन डोंगरांवर एक लाख झाडे लावली. मात्र ती जाळण्याच्या प्रकारचा मी निषेध करत असल्याचे आमदारांनी सांगितले आहे.

विकास आराखड्यामध्ये मार्किंग महत्त्वाची
कल्याण ग्रामीण भागाच्या विकास करण्यासाठी शहर विकास आराखड्याचा अवलंब सारणे आवश्यक आहे . असे मत आमदार गणपत गायकवाड यांनी मांडले आहे . आतासेच आरक्षण आणि विकास कामे , रस्ते यांचे मार्किंग दिल्यास अनधिकृत बांधकामे थांबवून कल्याण ग्रामीणच्या विकासाच्या दिशा उघडतील असे गायकवाड यांनी सांगितले आहे .

उपविभागीय अधिकारी बिल्डरांचा पार्टनर

उल्हासनगर मधील उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे हे उद्योजकांचे बिझनेस पार्टनर असल्याचे सांगत नेवाळी मधील शेतकऱ्यांच्या नावावर असलेले १८ सातबारे हे नेव्ही च्या नावावर झाले कसे ? असा प्रश्न देखिल त्यांनी उपस्थित केला आहे. नेवाळी विमानतळाच्या जागेवर १५ एकर जागेला उद्योजकांनी संरक्षण भिंत बांधली असून त्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत मात्र शेतकऱ्यांना घरे बंधायला देखील नेव्हीचे अधिकारी आडकाठी आणत असल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*