Home क्राइम वॉच मुंब्रा स्टेशनजवळ लोकलवरील दगडफेकीत तरुणी जखमी

मुंब्रा स्टेशनजवळ लोकलवरील दगडफेकीत तरुणी जखमी

 

ठाणे दि.5 ऑक्टोबर :

लोकलवर अज्ञात व्यक्तीने केलेल्या दगडफेकीत तरुणीला गंभीर दुखापत झाल्याची घटना काल रात्री मुंब्रा स्थानकाजवळ घडली. कांचन हाटले असं या तरुणीचं नाव असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिव्यात पश्चिमेला राहणारी कांचन मुलुंडच्या एका खासगी कंपनीत काम करते. काल रात्री ऑफिसमधून तिने ठाण्याहून नऊ वाजताची डोंबिवली स्लो लोकल पकडली. ही लोकल सव्वा नऊच्या सुमारास मुंब्रा खाडी पुलाजवळ येताच अचानक मागील बाजूकडील महिलांच्या फर्स्ट क्लास डब्यावर अज्ञात व्यक्तीने दगड फेकून मारले. त्यामध्ये कांचनसह आणखी एका तरुणीला दुखापत झाली. या प्रकारामुळे लोकलमध्ये एकच खळबळ उडाली. कांचनच्या चेहऱ्याला मोठी दुखापत झाली असून दोन दात तुटले आहेत. तिच्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून रात्रीच तातडीची शस्त्रक्रियाही करण्यात आल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली. या सगळ्या प्रकारानंतर लोकलवर दगडं मारणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी कांचनच्या आईने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*