चक्क पद्धतशीर रांगा लावून विकत घेतली जातेय दारू

कल्याण दि.13 मे : सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर हायवेच्या 500 मीटर अंतरावरील दारूची दुकाने आणि बार बंद झाले आहेत. त्याला कल्याण शहरही अपवाद नसून शहरातील हायवेलगतची अनेक दुकाने आणि बार बंद झाल्याने मद्यप्रेमींची काहीशी निराशा झाली आहे. मात्र ‘इच्छा तिथे मार्ग’  या म्हणीप्रमाणे मद्यप्रेमींनी या समस्येचा उपाय शोधला आहे. कल्याण पश्चिमेतील सिंडिकेट परिसरात असणाऱ्या वाईन …

कल्याण-डोंबिवली परिसरात शुक्रवारी रात्री विजांच्या लखलखाटासह अवकाळी पाऊस

कल्याण दि.13 मे : कल्याण – डोंबिवली परिसरात शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोबतीला विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाटामुळे कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. शुक्रवारी संध्याकाळीच पाऊस पडण्याची चिन्ह निर्माण झाली होती. आकाशात काळ्या ढगांनी केलेली गर्दी, जोरदार सुटलेलं वारं आणि विजांचा लखलखाट यामुळे सांधकाळीच पाऊस पडेल असे वाटत होते. मात्र …

कल्याणकर तरुणाच्या सजगतेमुळे वाचला अपघातातील बाईकस्वाराचा जीव

कल्याण दि.11 मे : एकीकडे दिवसेंदिवस समाजातील बघ्यांची गर्दी वाढत असतानाच कल्याणात राहणाऱ्या एका तरुणाच्या सजगतेमुळे एका मद्यपी बाईकस्वाराचा जीव वाचण्यास मदत झाली आहे. रौनक तन्ना असे या कल्याणकर तरुणाचे नाव आहे. रौनक काल रात्री नेहमी प्रमाणे ठाण्याहून कल्याणला घरी परतत होता. त्यावेळी ठाणे- भिवंडी मार्गावर माणकोलीजवळील पेपेट्रोल पंपाबाहेर भरधाव वेगातील एका बाईकस्वाराने कारला जोरदार …

आंतराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूने जिंकली तब्बल 4 सुवर्णपदकं

कल्याण दि.5 मे : इंडोनेशिया येथे सुरू असणाऱ्या एशियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कल्याणच्या कुणाल पाटीलने एक नवा इतिहास रचला आहे. भारताच्या पुरुष संघाकडून खेळताना 105 किलो वजनी गटातील सर्वच सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले आहे. यापूर्वी 15 वर्षांपूर्वी कल्याणकर महिला खेळाडू दिपाली कुलकर्णीने अशीच 4 सुवर्ण पदकं जिंकली होती. कुणालने केलेल्या या देदीप्यमान कामगिरीमुळे कल्याणकरांची मान …

महापालिका कर्मचाऱ्याच्या मुलाने पटकावले आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत मेडल

कल्याण दि.4 मे : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या मुलाने आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य पदक पटकावत कल्याण डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अक्षय बाळाराम गायकवाड (वय 26) असे या तरुणाचे नाव आहे. गेल्या महिन्यात 26 ते 30 एप्रिल दरम्यान तुर्कमेनिस्तान देशात ही स्पर्धा संपन्न झाली. डोंबिवलीकर अक्षयने या स्पर्धेतील उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली मात्र …

माळशेज घाट रस्ता बंद ठेवण्याबाबत वाहन चालकांमध्ये संभ्रम

कल्याण दि.26 एप्रिल : 25 एप्रिलपासून पुढील 10 दिवस माळशेज घाट रस्ता बंद ठेवण्याबाबतचे महामार्ग विभागाचे पत्र सोशल मिडीयावर अक्षरशः वाऱ्यासारखे व्हायरल झाले आणि एकच गोंधळ उडाला. त्यातच संबंधित विभागाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यास लागलेला विलंब आणि  प्रसिद्धी माध्यमांमधील बातम्यांनी या गोंधळात अधिकच भर पडला. परिणामस्वरूप या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा …

साळगावकर चषक क्रिकेट स्पर्धा; के.सी.गांधीची डोंबिवली बॉईजवर मात

कल्याण दि.24 एप्रिल : 12 वर्षाआतील मुलांच्या साळंगावकर चषक क्रिकेट स्पर्धेत कल्याणच्या के.सी. गांधी शाळेच्या संघाने डोंबिवलीच्या बाॅइज सी.सी.(सी) संघाला तब्बल 105 धावांनी मात देत विजय संपादन केला. 67 चेंडूत नाबाद 99 धावा आणि 2 बळी अशी अष्टपैलू कामगिरी करून  जयकुल गिरासेने या विजयात सिंहाचा वाटा उचलला.   कल्याणच्या वायलेनगर येथील युनियन क्रिकेट अकादमीच्या मैदानावर …

खारघरमध्ये गाड्यांच्या शोरूमला भीषण आग ;दोघांचा होरपळून मृत्यू

नवी मुंबई दि.23 एप्रिल : खारघरमधील आदित्य प्लॅनेट बिंल्डिंगमधील मारूती सुझुकीच्या शोरूमला भीषण आग लागली. यामध्ये शोरूममधील मारुती सुझूकीच्या नव्या कोऱ्या 8 ते 10 गाड्या जळून खाक झाल्यात. तर शोरुमच्या दोन्हीही वॉचमनचा होरपळून मृत्यू झालाय. कृष्ण कुमार आणि जितेंद्र कुमार अशी मृतांची नावं आहेत. खारघर सेक्टर 10 मध्ये सायन-पनवेल हायवेच्या बाजुलाच आदित्य प्लॅनेट बिल्डिंग आहे. या …

ठाण्याचा सागर माळी ‘महाराष्ट्र श्री’ तर स्टेमी डिसूझा ठरली ‘मिस महाराष्ट्र श्री’

  कल्याण दि.16 एप्रिल : कल्याणात झालेल्या 56 व्या महाराष्ट्र श्री आणि 5 व्या मिस महाराष्ट्र श्री शरिरसौष्ठव स्पर्धेत ठाण्याच्या सागर माळीने ‘महाराष्ट्र श्री’ तर मुंबईच्या स्टेमी डिसूझाने ‘मिस महाराष्ट्र श्री’चा किताब पटकावला. तर यंदाचे 3 रे वर्ष असणाऱ्या मेन्स फिजिक स्पर्धेचा ठाण्याचा सिद्धांत जयस्वाल विजेता ठरला. कल्याणातही कल्याण स्पोर्टस क्लब येथे ही अतिशय नेटक्या आयोजनाची …

गुड न्यूज : दहावीच्या विद्यार्थ्यांना आता शाळेतच मिळणार विविध दाखले

कल्याण दि.13 एप्रिल : दहावीचा निकाल लागल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक ते दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना करावी लागणारी वणवण वाचणार असून आवश्यक ते सर्व दाखले शाळेतच उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राष्ट्रवादीचे कल्याण पश्चिम विधानसभा सरचिटणीस प्रविण कुबेर मुसळे यांचा यासंदर्भात गेले वर्षभर पाठपुरावा सुरू होता. राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासह राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष …