समृद्धी महामार्गाबाबत आपण शेतकऱ्यांच्या पाठिशी- खासदार कपिल पाटील

कल्याण, दि. 14 जुलै : समृद्धी महामार्गाच्या विरोधात आपण नाही. मात्र, महामार्गासाठी भूसंपादनाच्या प्रश्नात आपण शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच बैठक घेण्यात आल्याची माहिती खासदार कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. खासदारपदाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी कल्याणमध्ये खासदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते …

शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ – अजित पवार यांचे टिकास्त्र

कल्याण दि.9 जुलै: ‘शिवसेनेची अवस्था म्हणजे दोन तोंडाच्या गांडुळासारखी झाली आहे. दिवसा मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकत्र बसून निर्णय घ्यायचे आणि संध्याकाळी त्याच निर्णयाला विरोध करायचा. अशा धरसोड वृत्तीमुळेच १९५ आमदारांचा पाठिंबा असूनही ३० वर्षातलं हे सगळ्यात दुर्बल सरकार आहे.’ अशी टीका अजित पवार यांनी केली. कल्याणमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सेना-भाजपवर टीकास्त्र …

नागरी समस्या सोडवण्यासाठी लोकांचा उत्स्फूर्त सहभाग गरजेचा – महापौर राजेंद्र देवळेकर

कल्याण दि.28 जून : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राची सर्वंकष जबाबदरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे असली तरी इथल्या नागरी समस्या सोडवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आणि उत्स्फूर्त सहभागही अत्यावश्यक असल्याचे मत महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केले. कल्याण डोंबिवली पत्रकार संघातर्फे आयोजित ‘दिलखुलास संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहर विकास, सतत भेडसावणारे नागरी प्रश्न, महापालिकेची स्थिती, भविष्यातील …

भाजपच्या बॅनर आणि कमानीची अज्ञातांकडून मोडतोड

कल्याण दि.15 जून : कल्याण पश्चिमेतील आमदार नरेंद्र पवार यांच्या आमदार निधीतून साकारत असणाऱ्या निसर्ग उद्यानाच्या भूमीपूजनस्थळी उभारण्यात आलेल्या भाजपच्या बॅनर आणि कमानीची अज्ञात व्यक्तींनी मोडतोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही मोडतोड नेमकी कोणी आणि का केली याबाबत मात्र माहिती समजू शकली नाही.   आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून कल्याण पश्चिमेतील श्री कॉम्प्लेक्स चौकात …

भिवंडी महापालिकेत ‘पंज्या’ला साथ ‘धनुष्यबाणा’ची

  भिवंडी दि.9 जून : राज्यात एकीकडे भाजप आणि सेनेमधील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस चिघळत असताना शिवसेनेने चक्क काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याची निर्णय घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राज्यात एकीकडे भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या सेनेने भाजपविरोधात उघडपणे घेतलेली ही भूमिका आगामी काळातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी समजली जात आहे. भिवंडी महापालिकेच्या आज झालेल्या निवडणूकीत काँग्रेसने महापौरपद …

आंदोलनापूर्वीच कार्यकर्त्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस नाराज

कल्याण दि.9 जून : आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी केलेल्या कार्यकर्त्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस पक्षाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. भाजप सरकार पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन चिरडत असून ही एकप्रकारे लोकशाहीची हत्या असल्याचा घणाघात कल्याण शहर जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला आहे.   काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मध्यप्रदेशात झालेल्या अटकेच्या निषेधार्थ कल्याणात काँग्रेसतर्फे आंदोलन केले जाणार होते. …

कल्याण डोंबिवलीसाठी पूर्ण वेळ अधिकारी न दिल्यास आंदोलन – महापौर राजेंद्र देवळेकर

कल्याण दि.3 जून : कल्याण डोंबिवली महापालिकेत काही दिवसांपूर्वीच नियुक्त झालेले नविन आयुक्त पी. वेलरासु प्रशिक्षणासाठी महिनाभर रजेवर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर राजेंद्र देवळेकर यांनी पत्रकार परिषद घेत आयुक्तांच्या संगीत खुर्चीबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आयुक्तांच्या या बदल्यांमागे शासनाचा चांगला हेतू दिसत नाही. शिवसेनेची सत्ता असल्याने महापालिकेच्या कामात खोडा घालण्याचे काम शासनाकडून सुरु असल्याचा …

आयुक्त महिनाभरासाठी रजेवर; कल्याण डोंबिवली पालिकेचा खेळ-खंडोबा कायम

कल्याण दि.3 जून : आधीच आपल्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे बदनाम झालेली कल्याण डोंबिवली महापालिका आता एका नव्या कारणामुळे चर्चेत येत आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच नविन आयुक्त म्हणून पदभार घेणारे पी. वेलरासु मसुरी येथे प्रशिक्षणासाठी जायचे असल्याने आजपासून महिनाभर सुट्टीवर जात आहेत. त्यामूळे कल्याण डोंबिवली महापालिकेचा राज्य शासनाने खेळखंडोबा केल्याची टिका सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून …

पनवेलमध्ये फुलले कमळ तर भिवंडीनी केले काँग्रेसला जवळ

भिवंडी/ पनवेल दि.26 मे : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या पनवेल, भिवंडी-निजामपूर महापालिका निवडणुकांचे अंतिम निकाल समोर आले असून पणवेलमध्ये कमळ फुलले असताना दुसरीकडे भिवंडीकरांनी मात्र काँग्रेसला जवळ केल्याचे दिसून आले. तर पनवेलमध्ये शिवसेनेला भोपळाही फोडता न आल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नव्यानंच अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेवर शेकापचं वर्चस्व राहणार की भाजपचा …

बसेसच्या दुरावस्थेविरोधात मनसेने काढली केडीएमटी बसची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

कल्याण दि.18 मे : कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन अर्थात केडीएमटीच्या वाजलेल्या बोऱ्या आणि वापरात नसणाऱ्या नविन बसेसच्या दुरावस्थेविरोधात मनसेने आज अभिनव आंदोलन केले. केडीएमटीच्या बसची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून ती बस परिवहन अधिकाऱ्यांना भेट दिली. कल्याण पूर्वेतील नेतीवली परिसरातील सुप्रसिद्ध मॉलशेजारी केडीएमटीची जागा असून त्याठिकाणी अनेक नव्या बस गेल्या कित्येक महिन्यांपासून धूळ खात पडल्या आहेत. जेएनएनयुआरएमअंतर्गत …