मानवाधिकार दिनानिमित्त संजिवनी फाऊंडेशन-लुर्डस कम्युनिटी सेंटरतर्फे प्रभातफेरी…

कल्याण दि.10 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त कल्याणातील संजिवनी फाऊंडेशन आणि लुर्डस कम्युनिटी सेंटरतर्फे प्रभातफेरी काढण्यात आली. त्यामध्ये कल्याणातील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. सध्या अतिशय गंभीर समस्या बनलेल्या ‘मानवी तस्करी’संदर्भात या प्रभातफेरीद्वारे जनजागृती करण्यात आली. येथील लुड्स शाळेपासून निघालेली ही फेरी मुरबाड रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान, शिवाजी चौक, सहजनांद चौक, संतोषी …

अपघातस्थळी कर्तव्य निभावताना पोलिसाचाच अपघाती मृत्यू…

कल्याण दि.10 डिसेंबर : हायवेवर झालेल्या अपघातस्थळी आपले कर्तव्य निभावत असताना भिवंडी पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. बुधवारी रात्री दिड वाजण्याच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावर ही घटना घडली. येथील सोनाळे गाव परिसरात रात्री भाजीचा टेंपो उलटून झालेल्या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पडघा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेलं पोलीस नाईक फकिरा तडवी(४८) हे वाहतूक कोंडी …

दहावीच्या मार्च 2016 परिक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मुंबई दि.8 डिसेंबर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या 2016 मधील लेखी परीक्षेचंवेळापत्रक जाहीर झालं आहे. 1 मार्च 2016 पासून लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे.   वेळापत्रक 1. मराठी – मंगळवार -1/3/2016 2. हिंदी – गुरुवार – 3/3/2016 3. इंग्रजी – शनिवार – 5/3/2016 4. बीजगणित – मंगळवार – 8/3/2016 5. भूमिती – गुरुवार …

मान सन्मान देणारा पेशा म्हणजे संरक्षण दलातील नोकरी – मेजर सुभाष गावंड…

कल्याण दि.8 डिसेंबर : देशाचे रक्षण करत आपले जीवन सार्थकी लावा, सैन्य म्हणजे मृत्यू हे समीकरण बदला असा सल्ला निवृत्त मेजर सुभाष गावंड यांनी दिला. सुभेदार वाडा कट्ट्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘सैन्य दलातील संधी’ या विषयावर बोलताना मेजर गावंड यांनी हा सल्ला दिला. जगातील प्रत्येक व्यक्ती ज्या जीवनावश्यक गोष्टींसाठी मेहनत करतो, त्या सर्वांबरोबर मान …

सोनवणे कॉलेजमधील ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांची रस्ते सुरक्षेबाबत बाईक रॅली…

कल्याण दि.8 डिसेंबर : रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी लक्ष्मण देवराम सोनवणे कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कल्याणात बाईक रॅली काढली होती. येथील दुर्गामाता चौक, लालचौकी, सहजानंद चौक, शिवाजी चौक, जुना स्टेशन रोड, स्टेशन परिसर, शंकरराव चौक, टिळक चौकयाठिकाणी ही रॅली काढण्यात आली. यावेळी काही ठिकाणी या विद्यार्थ्यांनी पथनाट्येही सादर केली. वाहनचालकांमध्ये रस्ते सुरक्षिततेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी …

कल्याणच्या नायब तहसिलदार आणि तलाठ्याला 25 हजारांची लाच घेताना पकडले…

कल्याण दि.7 डिसेंबर : कल्याण तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार अभिजित देशमुख आणि तलाठी जनार्दन सूर्यवंशी यांना मटेरियल पुरविणाऱ्या व्यावसायिकाकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे अँटी करप्शनने रंगेहाथ पकडले आहे. कल्याण तहसील कार्यालयातील आपल्याच कार्यालयात देशमुख यांना पकडण्यात आले. कल्याणमधील व्यवसायिकाने 100 ब्रास माती खणन करण्याच्या परवान्याचे काम हाती घेतले होते.   यासाठी त्यांनी तहसिल …

येत्या गुरुवारी कल्याणात जिल्हास्तरीय ‘बॉडीबिल्डिंग’ स्पर्धेचे आयोजन…

कल्याण दि.7 डिसेंबर : नवोदित बॉडीबिल्डर्सना (शरीर सौष्ठवपटू) व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने येत्या गुरुवारी कल्याणात जिल्हास्तरीय ‘नवोदित ठाणे श्री 2015’ या बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स संघटनेतर्फे ही स्पर्धा होणार असल्याची माहिती सरचिटणीस राजेंद्र चव्हाण यांनी दिली. कल्याण पश्चिम येथील रेल्वे इन्स्टिट्यूट हॉलमध्ये गुरुवारी 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 …

डोंबिवली रेतीबंदरावर अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई…

  डोंबिवली दि ६ डिसेंबर : ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ अश्विनी जोशी यांनी स्वत: बोटीतून मुंब्र्याहून निघून डोंबिवली गणेशघाट येथे रेती उपश्याच्या ठिकाणांवर धडक मारली आणि मोठा मुद्देमाल ताब्यात घेतला. दोन महिन्यांपूर्वी देखील एक मोठी कारवाई या वाळू उपशाविरुध्द करण्यात आली होती. कालपासूनच ठाणे, भिवंडी आणि कल्याण भागातील खाडी किनारी रेती माफियांविरुध्द कारवाई धडाक्यात सुरु आहे. …

अपंगत्वावर मात करीत चौघा डोंबिवलीकरांची जलतरण स्पर्धेत पदकांची लयलूट…

डोंबिवली दि.2 डिसेंबर : डोंबिवलीतील चार जलतरणपटूंनी राष्टीय जलतरण स्पर्धेमध्ये पदकांची अक्षरशः लयलूट करीत आपला ठसा उमटविला आहे. विशेष म्हणजे या चार जणांपैकी 1 जण अंध तर इतर 3 जण अपंग असल्याने या चौघा डोंबिवलीकरांनी संपादन केलेले यश हे इतरांपेक्षा निश्चित उजवे ठरले आहे. सिद्धार्थ सावंत, गीतांजली कुलकर्णी, हर्षा दामले आणि मेरिलीन डिमेलो अशी या …

महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘एनडीआरएफ’चे पथक ठाण्यात…

ठाणे दि.1 डिसेंबर : ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका यांनी आपत्तीची परिस्थिती कशी हाताळावी यावर एक सर्वंकष प्रशिक्षण देण्यासाठी एनडीआरएफचे पथक ठाणे शहरात दाखल झाले असून आजपासून या प्रशिक्षणास प्रारंभ झाला आहे. हे प्रशिक्षण ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत दिले जात आहे. उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांनी या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन केले. यावेळी …