विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने कल्याण -डोंबिवलीला झोडपले

कल्याण दि.27 जून : शनिवारच्या धुंवाधार बॅटींगनंतर 2 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसराला झोडपून काढले आहे. परिणामस्वरूप शहरांतील सखल भागात नेहमीप्रमाणे पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी काही काळ झोडपून काढल्यानंतर पावसाने 2 दिवस विश्रांती घेतली. आणि मंगळवारी पहाटेपासून पुन्हा एकदा मुसळधार बरसायला सुरुवात केली. त्यामूळे शहरांतील सखल …

कल्याणातील जागतिक किर्तीचे प्रसूतीतज्ञ डॉ. राजन वैद्य यांचा केंद्र सरकारकडून गौरव

कल्याण दि.26 जून : वंध्यत्वाच्या समस्येवर अत्यंत माफक दरात आयव्हीएफ उपचार करणारे जागतिक कीर्तीचे प्रसूती तज्ञ डॉ. राजन वैद्य यांचा केंद्र सरकारने नुकताच गौरव केला आहे. त्यानिमित्ताने कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी त्यांचा सत्कार केला.   गेल्या 21 वर्षांपासून आयव्हीएफ तज्ञ म्हणून डॉ. वैद्य कार्यरत आहेत. 21 वर्षांच्या या प्रदीर्घ काळात त्यांनी तब्बल दिड …

कल्याणातील पहिल्या शेतकरी आठवडी बाजारात ७ टन भाजीपाल्याची विक्री

  *कल्याण दि.२५ जून :* काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरु असतांना कल्याणात पहिल्या वहिल्या शेतकरी आठवडी बाजाराचे उद्घाटन तर झालेच परंतु तब्बल ७ टन भाजीपाला विक्री झाल्याने आयोजकांना सुखद धक्का बसला. खासदार कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आधारवाडी येथे महापौर बंगल्याजवळ सकाळी या बाजाराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी आमदार नरेंद्र पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे, सुनील वायले …

गेल्या 24 तासांत ठाणे जिल्ह्यात तब्बल 1 हजार 239 मिमी पाऊस

ठाणे दि.25 जून : गेल्या 24 तासांत ठाणे जिल्ह्यात तब्बल 1 हजार 239.30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यातही सर्वाधिक पाऊस ठाणे, भिवंडीत झाला आहे.   गेल्या 24 तासांत झालेला पाऊस…* *ठाणे* – 204 मिमी  *कल्याण* – 151 मिमी *मुरबाड* – 153 मिमी *उल्हासनगर* – 173 मिमी *अंबरनाथ* – 163 मिमी *भिवंडी* – 205 मिमी *शहापूर* – …

कल्याण- डोंबिवली परिसरात रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग

कल्याण दि.25 जून : गेल्या कित्येक दिवसांपासून केवळ पाहुण्यांप्रमाणे दर्शन देऊन निघून जाणाऱ्या पावसाने कालपासून कल्याण डोंबिवली परिसराला चांगलेच झोडपून काढले आहे. संध्याकाळपासून सुरू झालेला हा पाऊस अजूनही मनसोक्त बरसत आहे. विजांच्या लखलखाटातआणि ढगांच्या गडगडाटाच्या साथीने पावसाने धडाकेबाज एन्ट्री मारून सुखद धक्का दिला. कल्याण डोंबिवलीप्रमाणे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी भागातही पावसाची संततधार कायम असल्याचे दिसत …

शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

  मुंबई दि.24 जून: राज्यातील शेतकऱ्यांचं सरसकट दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीवर ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ असं या कर्जमाफीला नाव देण्यात आले आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाच्या 25 टक्के रक्कम (25 हजार रुपये कमाल मर्यादा) अनुदान …

नेवाळी प्रकरणात सरकारचा अक्षम्य हलगर्जीपणा – राधाकृष्ण विखे पाटील

कल्याण दि.23 जून : नेवाळी प्रकरण हाताळण्यात राज्य सरकारने अक्षम्य हलगर्जीपणा केल्याची टिका विरोधी पक्षेनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. नेवाळी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या पॅलेट गनच्या गोळीबारात जखमी आंदोलकांची विरोधी पक्षनेत्यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली. मुळातच राज्य सरकारने या प्रकरणाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यात शेतकऱ्यांवर …

नेवाळी येथील आंदोलनात 12 आंदोलक तर 12 पोलीस अधिकारी-कर्मचारी जखमी

नेवाळी दि.22 जून : नेव्हीकडून जमिन संपादित करण्याविरोधात नेवाळी परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान 12 आंदोलक आणि 10 पोलीस अधिकारी – कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आज सकाळी रास्तारोको करण्यासाठी उतरलेला स्थानिकांचा जमाव अचानक आक्रमक …

नागरिकांना जेवढे फुकट मिळेल तेवढे पाहिजे असते- शिक्षणमंत्री विनोद तावडे

कल्याण दि.15 जून : “आम्हा राजकीय नेत्यांना सगळंच फुकट द्यायची सवय असते. नागरिकसुद्धा जेवढे जेवढे फुकट मिळेल तेवढे बरं याच मूडमध्ये असतात” असे वक्तव्य करून राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून गोदरेज हिल परिसरात उद्यान साकारण्यात येत आहे. त्याचे भूमीपूजन शिक्षणमंत्री विनोद तावडे …

कल्याण-डोंबिवली परिसरात जोरदार पावसासह आकाशात विजांचे तांडव

कल्याण दि.14 जून : 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर कमबॅक केलेल्या पावसाने बुधवारी रात्री कल्याण – डोंबिवलीसह आसपासच्या शहरांना अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पाऊस, त्याजोडीला ढगांचा   गडगडाट आणि त्याहून भयंकर सुरू असणाऱ्या विजांच्या कडकडाटाने आसमंत दणाणून सोडला. जणू काही आकाशात ढग आणि विजांचे तांडव नृत्यच सुरू आहे की काय असा प्रश्न सर्वाना पडला होता. कानठळ्या बसवणाऱ्या या …