टिटवाळा येथील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला

टिटवाळा दि.14 जुलै: कल्याण तालुक्यातील काळू नदीवर असणाऱ्या रूंदे गावाजवळील 2 पुल पाण्याखाली गेल्याने गावांचा टिटवाळा शहराशी संपर्क तुटला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुलावरील पाणी ओसरण्याच्या प्रतिक्षेत असणारे नागरिक दिसत आहेत. सकाळपासून नदीच्या उगमस्थानी कोसळणाऱ्या पावसामुळे टिटवाळा जवळील काळू नदीवरील रूंदे गावा शेजारील पुल पाण्याखाली गेला आहे. यामुळे लगतच्या रूंदे, आंबिवली, फळेगांव, मढ, हाल, उशीद,भोंगळ …

महापालिकेतील मुख्य सभागृहाचे छत कोसळले; सुदैवाने कोणाला दुखापत नाही

कल्याण दि.12 जुलै: कल्याण डोंबिवली महापालिकेतील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सभागृहाचे संपूर्ण छत कोसळण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी सभागृहाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.     या सभागृहाचे उद्घाटन होऊन आज बरोबर 15 वर्षे पूर्ण होत असतानाच हा प्रकार घडल्याने महापालिका इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही …

तुकाराम मुंढेंना इकडे आयुक्त म्हणून आणण्यासाठी प्रयत्नशील – गणपत गायकवाड

कल्याण दि.10 जुलै : कल्याण-डोंबिवली महापालिकेत यापूर्वी यु. पी.एस. मदान, टी. चंद्रशेखर, श्रीकांत सिंह यांच्यासारखे चांगले आयुक्त लाभले होते. मात्र आता तसे आयुक्त येत नसल्याने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुकाराम मुंढे यांना आयुक्त म्हणून द्या, अशी मागणी केल्याची माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी दिली आहे. कल्याण डोंबिवली पत्रकार संघातर्फे आयोजित ‘दिलखुलास संवाद’ कार्यक्रमात ते …

नेवाळीच्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण – आमदार गणपत गायकवाड

  डोंबिवली दि.6 जुलै : नेवाळीतील आंदोलकांना पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण केली जात असल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. तसेच या आंदोलकांना सोडवण्यासाठी वेळप्रसंगी आपल्या पदाचा त्याग करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात आयोजित आगरी, कुणबी, कोळी समाजाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. नेवाळी इथं नौदलानं सुरू केलेल्या १६७६ एकर …

स्वाईन फ्ल्यू’मूळे ठाणे जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू ; 242 जणांना लागण

ठाणे दि.5 जुलै : ‘स्वाईन फ्ल्यू’ने ठाणे जिल्ह्याला विळखा घालण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू झाला असून 242 जणांना स्वाईनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर ठाण्यातून मुंबईच्या खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या 3 रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्ल्यूच्या या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणांची …

घोडबंदर रोडवर गॅसचा टँकर उलटला; वाहतूक थांबवली

ठाणे दि.3 जुलै: ठाण्यावरुन गुजरातला जाणारा एलपीजी गॅसचा टँकर घोडबंदर मार्गावर उलटला त्यातून गॅसगळती सुरू झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. घोडबंदर रोडवरील काजूपाड्याजवळ आज दुपारी हा अपघात झाला. अपघातानंतर टँकर चालक आणि क्लिनर फरार झाले आहेत. या अपघातामुळे घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून ठाणे …

जूनमध्येच ठाणे जिल्ह्यात तब्बल 5 हजार मिलिमीटर पाऊस

 केतन बेटावदकर कल्याण दि.1 जुलै: ठाणे जिल्ह्यातील यंदाचा पावसाळा बहुधा रेकॉर्डब्रेक ठरण्याची चिन्ह सद्यस्थितीवरून दिसत असून पहिल्याच महिन्यात ठाणे जिल्ह्यात तब्बल 5 हजार मिलिमीटर पाऊस झाला आहे. जून महिन्याच्या सरासरीपेक्षा हा तब्बल 2 हजार मिलिमीटर अधिक पाऊस असून हा एक नवा विक्रम आहे.   यंदाच्या जूनमध्ये 7 तारखेचा मुहूर्त हुकवलेल्या पावसाने जिल्ह्यात अधून मधून हजेरी …

कल्याण स्टेशनजवळ एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून घसरले; रेल्वे वाहतूक विस्कळीत

कल्याण दि.30 जून : मुंबईकडे येणाऱ्या हजरत निजामुद्दीन एरनाकुलम मंगला एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान दिड तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वे इंजिन पुन्हा रुळावर आणण्यात आले.   आज दुपारी 2 वाजून 20 मिनिटांच्या  दरम्यान हा प्रकार घडला. मुंबईकडे येणारी मंगला एक्स्प्रेस कल्याण स्थानकाकडे येत होती. त्यावेळी रेल्वे ट्रॅक बदलत असताना …

महापालिकेचा आपत्कालीन कक्ष डेब्रीजच्या कॉल्सने हैराण

    केतन बेटावदकर कल्याण दि.29 जून : कल्याण डोंबिवली महापालिकेने सुरू केलेला आपत्कालीन कक्ष सध्या भलत्याच कारणाने हैराण झाला आहे. पावसाळ्याचा विचार करता त्या अनुषंगाने या कक्षाला फोन कॉल्स येणे अभिप्रेत असताना त्याऐवजी केवळ डेब्रीज उचलण्याच्या कॉल्सची आपत्ती या कक्षावर ओढावली आहे. महापालिकेतर्फे पावसाळ्यात दरवर्षी आपत्कालीन कक्ष स्थापन केला जातो. पावसाळयात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत …

कल्याणात साजरा झाला बाबांचा अनोखा वाढदिवस…

  कल्याण दि.28 जून : आज एकीकडे रक्ताच्या नात्यातील वीण उसवत चालली असून सख्खे लोकच एकमेकांचे हाडवैरी झाल्याचे दिसत आहेत. मग ते मायलेकीचं असो की पिता-पुत्राचे. या प्रत्येक नात्यांची जागा दुराव्याने घेतली असतानाच समाजातील या नकारात्मकतेला छेद देणारी आणि लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी घटना कल्याणात घडली आहे. कल्याणातील या तरुणाने आपल्या वडीलांचा वाढदिवस अशा …