बालक मंदिर शाळेने शेकडो दिप प्रज्वलित करून साजरी केली ‘दिप अमावस्या’

कल्याण दि.22 जुलै : आपल्या संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून दिव्यांना फार महत्व आहे. या दिव्यांचे महत्व सांगणारा, सन्मान करण्यासाठी आजच्या अमावस्येला ‘दिप अमावस्या’ म्हटले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा दिवस ‘गटारी’ नावाने कुप्रसिद्ध झाला आहे. त्यामूळे आपल्या संस्कृतीचे जतन करून नव्या पिढीपर्यंत ती पोहचवण्यासाठी कल्याणातील बालक मंदिर पूर्व प्राथमिक शाळेतर्फे एका चांगल्या उपक्रमाचे आयोजन करण्यात …

माहुली धबधब्यात बुडून कल्याणातील तरुणाचा मृत्यू

कल्याण दि.21 जुुलै: शहापूर जवळील माहुली किल्ला परिसरातील वन्यजीव विभागाने पर्यटकांसाठी खुल्या केलेल्या धबधब्यात गुरुवारी सायंकाळी तिसऱ्या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला आहे. कल्याणच्या बेतूरकर पाडा परिसरात राहणारा हा तरुण आपल्या मित्रांसोबत याठिकाणी आला होता.   या आधी याच महिन्यात या भागात दोन पर्यटकांचे मृत्यू झाले होते. गुरुवारी बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव राजेश दिलिप गोकर्ण (१८) असे …

बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यावर तीन दिवस जमावबंदी

बदलापूर दि.21 जुलै : बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यावर तीन दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. गटारीच्या पार्श्वभूमीवर आलेला विकेंड आणि त्यात अतिउत्साही पर्यटकांची स्टंटबाजी या गोष्टी विचारात घेऊन तहसीलदारांनी हा निर्णय घेतला आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर मुंबईपासून सर्वात जवळ आणि सहज पोहोचू शकणारा पिकनिक स्पॉट असलेल्या कोंडेश्वरला पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. मात्र गेल्या …

तर जनतेच्या साहाय्याने आम्हीच दुर्गाडीची डागडुजी करू – मंदार हळबे*

कल्याण दि.21 जुलै : दुर्गाडी किल्ला हा शिवाजी महाराजांनी बांधलेला असल्याचे लक्षात घेऊन किमान त्याच्या डागडुजीसाठी तरी सेना-भाजपने एकत्र यावे. अन्यथा मनसे जनतेच्या माध्यमातून निधी गोळा करून या किल्ल्याची डागडुजी करेल असा इशारा विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी दिला आहे.       दुर्गाडी किल्ला पुरातत्व खात्याकडे असू दे की महापालिकेकडे याच्याशी आम्हाला काही घेणे …

रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती

नवी दिल्ली दि. 20 जुलै:  देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा झाली आहे. राष्ट्रपती निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी काँग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला. रामनाथ कोविंद यांना 66 % म्हणजेच 7 लाख 2 हजार 44 मतं मिळाली, तर मीरा कुमार यांना 34 % म्हणजेच 3 लाख …

माहुली धबधब्यावरून बाहुबली स्टाईल उडी बेतली तरुणाच्या जीवावर

  कल्याण दि.20 जुलै :  अनेकांचे जीव जाऊनही धबधब्याच्या परिसरातील अतिउत्साही पर्यटकांची स्टंटबाजी काही केल्या कमी होताना दिसत नाही. असाच काहीसा प्रकार शहापूर येथील माहुली धबधब्यावर घडला आहे. अतिशय उंचावरून बाहुबली चित्रपटात दाखवल्याप्रमाणे उडी मारण्याच्या नादात तरुणाला जीव गमवावा लागला. पावसाळा सुरू झालाय जुले आणि ऑगस्ट महिन्यात निसर्ग वेडया मंडळींना कॉलेज तरुण तरुणीना वेध लागते …

धक्कादायक ; राज्य शासनाच्या लेखी दुर्गाडी किल्ला ‘ऐतिहासिक’ नाही

कल्याण दि.20 जुलै : एकीकडे राज्य सरकार अरबी समुद्रात छत्रपतींचे भव्य स्मारक उभारण्याच्या गमजा करीत असताना याच सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने मात्र कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. “याठिकाणी किल्ल्याचे मूळ स्वरूप स्पष्ट होईल असे अवशेष नसल्याने हा किल्ला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करता येणार नसल्याचे” अजब उत्तर शासनाने दिले आहे. विधानपरिषद आमदार …

ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा आणखी एक बुरुज ढासळला

कल्याण दि.19 जुलै : छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या कल्याणातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा आणखी एक बुरुज ढासळला आहे. संपूर्ण किल्ला जमीनदोस्त झाल्यानंतर प्रशासन त्याची डागडुजी करणार आहे का? असा संतप्त सवाल कल्याणकर विचारत आहेत.   गेल्या काही दिवसांपासून कल्याण आणि परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. तर काही महिन्यांपूर्वी या किल्ल्याच्या समोरील दिशेकडे असणारा बुरुज ढासळला होता. …

‘सीए’च्या परीक्षेत डोंबिवलीकर राज परेश शेठ देशात पहिला

  डोंबिवली दि.18 जुलै : डोंबिवलीतील राज परेश शेठ हा २२ वर्षाचा तरुण सीएच्या परीक्षेत देशात पहिला आहे. ८०० पैकी ६३० गूण मिळवून राजने बाजी मारली असून मुंबईतील कृष्णा पवन गुप्ता हा देशात तिसरा आला आहे. तर अगस्थीवरन एस हा देशात दुसरा आला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सीए सीपीटी व …

कल्याण तालुक्यातील म्हारळ परिसरात घराची भिंत कोसळून २ ठार; ६ जखमी

  कल्याण दि.16 जुलै :   कल्याण तालुक्यातील म्हारळ परिसरात अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळून २ जण ठार तर ६ जण जखमी झाले. रविवारी पहाटे ५ वाजता हे सर्ववजण झोपेत असताना ही दुर्घटना घडली. सैफुद्दीन अल्लाउद्दीन खान (४५) आणि इस्लाम निजामुद्दीन शेख (४५) अशी दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. कल्याणचे तहसिलदार अमित सानप यांनी या वृत्ताला दुजोरा …