अपंगत्वावर मात करीत चौघा डोंबिवलीकरांची जलतरण स्पर्धेत पदकांची लयलूट…

डोंबिवली दि.2 डिसेंबर : डोंबिवलीतील चार जलतरणपटूंनी राष्टीय जलतरण स्पर्धेमध्ये पदकांची अक्षरशः लयलूट करीत आपला ठसा उमटविला आहे. विशेष म्हणजे या चार जणांपैकी 1 जण अंध तर इतर 3 जण अपंग असल्याने या चौघा डोंबिवलीकरांनी संपादन केलेले यश हे इतरांपेक्षा निश्चित उजवे ठरले आहे. सिद्धार्थ सावंत, गीतांजली कुलकर्णी, हर्षा दामले आणि मेरिलीन डिमेलो अशी या …

आणखी एका डोंबिवलीकर प्रवाशाचा लोकलमधून पडून मृत्यू…

डोंबिवली दि.2 डिसेंबर : डोंबिवलीकर भावेशच्या मृत्यूला 2 दिवसही उलटत नाहीत तोच आणखी एका डोंबिवलीकर प्रवाशाचा लोकलमधून पडल्याने मृत्यू झाला आहे. सततच्या घडत असलेल्या या घटनांमुळे कल्याण डोंबिवलीतील प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण असून त्यांचे कुटुंबिय मात्र चिंताग्रस्त झाले आहेत. सोमवारी रात्री 9 च्या सुमारास दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकादरम्यान पुन्हा अशाच प्रकारची घटना घडली. लोकलमधून पडल्याने …

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य होण्यासाठी शौचालय असणे आणि वापरणे बंधनकारक…

मुंबई दि. 1 डिसेंबर : महापालिका, नगरपालिका यासारख्या नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य होण्यासाठी स्वत:च्या निवासस्थानी शौचालय असणे आणि त्याचा वापर करणे अनिवार्य करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये तरतूद करण्यात येणार आहे. याआधी ग्रामीण …

महाराष्ट्रातील 51 शहरांमध्ये राबविली जाणार ‘प्रधानमंत्री आवास योजना’…

मुंबई दि.1 डिसेंबर : प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे तसेच या योजनेत समावेश न होऊ शकलेली सर्व जिल्हा मुख्यालये (सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस ऐवजी सावंतवाडी हा अपवाद वगळता) अशा एकूण 51 शहरांमध्ये राज्याच्या सहाय्यासह लागू करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. एकूण चार भागात ही योजना …

महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘एनडीआरएफ’चे पथक ठाण्यात…

ठाणे दि.1 डिसेंबर : ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका यांनी आपत्तीची परिस्थिती कशी हाताळावी यावर एक सर्वंकष प्रशिक्षण देण्यासाठी एनडीआरएफचे पथक ठाणे शहरात दाखल झाले असून आजपासून या प्रशिक्षणास प्रारंभ झाला आहे. हे प्रशिक्षण ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत दिले जात आहे. उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांनी या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन केले. यावेळी …

शेकडो दिपमालांनी उजळला कल्याणचा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला…

कल्याण दि.25 नोव्हेंबर : त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दिव्यांची रोषणाई करण्यात आली…त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव मंडळातर्फे दरवर्षी हा अनोखा सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतो. दुर्गाडी किल्ल्यावरील ही तेजाची रोषणाई पाहण्यासाठी कल्याणकरांनीही दुर्गाडी किल्ल्यावर मोठी गर्दी केली. @ localnewsnetwork.in

शहरांचा विकास ही नागरिकांचीही जबाबदारी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

भिवंडी दि २५ नोव्हेंबर :  भिवंडीसारख्या झपाट्याने विकसित होत असलेल्या आणि एक नवीन ओळख निर्माण करणाऱ्या शहरासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही. मात्र कुठल्याही शहराचा विकास ही केवळ शासनाची जबाबदारी नसून तो विकास टिकवणे ही नागरिकांचीदेखील जबाबदारी आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज येथील वंजारपट्टी उड्डाणपुलाचे उद्घाटन आणि राजीव गांधी …

काँग्रेस पदाधिकारी राकेश मुथा यांचा भाजपत प्रवेश… निवडणूक काळात पक्ष निरीक्षकांनी लाखो रुपयांची मागणी केल्याचा आरोप

कल्याण दि.25 नोव्हेंबर : पक्षात सतत बंडखोरी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना मानाचे स्थान मिळत असल्याच्या निषेधार्थ कल्याणातील काँग्रेस पदाधिकारी राकेश मुथा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भिवंडी येथे एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुथा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मुथा यांनी पक्ष निरीक्षक आणि …

“निवास पुरावा म्हणून कोणत्याही शासकीय कार्यालयाने रेशनकार्ड मागू नये”

मुंबई, दि.22 नोव्हेंम्बर : निवासाचा पुरावा म्हणून यापुढे कोणत्याही शासकीय कार्यालयाने शिधापत्रिकेची मागणी करू नये, अशी सूचना त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य अन्न-नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाने या संबंधी नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. विविध शासकीय कार्यालये, प्राधिकरणाकडून अर्जदारांना निवासी पुराव्यासाठी शिधापत्रिकेची मागणी करण्यात येत असल्याचे शासनाच्या निर्दशनास आले …

महानगरपालिका, नगरपरिषदांनी मराठी भाषेतूनही कारभार करावा…

ठाणे दि २० नोव्हेंबर : महानगरपालिका तसेच नगरपरिषदा / नगरपंचायती यांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजात मराठीचा वापर केलाच पाहिजे असे नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे. पालिकांकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती, निविदा सुचना, तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या नोटीसा इंग्रजी भाषेसह मराठीतून देखील देण्यात याव्यात असे शासनाने म्हटले आहे. याबाबत पालिकांकडून केवळ इंग्रजीचाच वापर होतो यावर विधान परिषद सदस्यांनी …