स्वाईन फ्ल्यू’मूळे ठाणे जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू ; 242 जणांना लागण

ठाणे दि.5 जुलै : ‘स्वाईन फ्ल्यू’ने ठाणे जिल्ह्याला विळखा घालण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू झाला असून 242 जणांना स्वाईनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर ठाण्यातून मुंबईच्या खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या 3 रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्ल्यूच्या या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणांची …

डोंबिवलीत धोकादायक इमारतीचा भाग कोसळला

  डोंबिवली दि.5 जुलै: डोंबिवली पूर्वेच्या आयरे रोड परिसरात असणाऱ्या धोकादायक इमारतीचा भाग कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवलीच्या पूर्व भागातील आयरे रोड परिसरात गंगाराम सदन नावाची 35 वर्ष जुनी इमारत आहे. गेल्या काही वर्षांत धोकादायक बनलेल्या या इमारतीमध्ये काही रहिवाशांचे वास्तव्य होते. आज …

घोडबंदर रोडवर गॅसचा टँकर उलटला; वाहतूक थांबवली

ठाणे दि.3 जुलै: ठाण्यावरुन गुजरातला जाणारा एलपीजी गॅसचा टँकर घोडबंदर मार्गावर उलटला त्यातून गॅसगळती सुरू झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. घोडबंदर रोडवरील काजूपाड्याजवळ आज दुपारी हा अपघात झाला. अपघातानंतर टँकर चालक आणि क्लिनर फरार झाले आहेत. या अपघातामुळे घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून ठाणे …

नार्को टेररिझम’विरोधात एकत्रित लढा आवश्यक

कल्याण दि.3 जुलै : तरुणांमध्ये त्यातही शालेय विद्यार्थ्यांमध्ये वेगाने फोफावणाऱ्या व्यसनाधीनतेला ‘नार्को टेररिझम’ जबाबदार असून त्याविरोधात सर्व स्तरातून एकत्रित लढा आवश्यक असल्याचे मत कल्याणातील एका कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्तालय, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3, दिशा सामाजिक संस्था आणि अंजूमन फाउंडेशनतर्फे नॅशनल उर्दू हायस्कुलमध्ये आयोजित ‘अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले होते. …

पालिकेच्या महिला प्रभाग अधिकाऱ्याला 25 हजारांची लाच घेताना पकडले

कल्याण दि.1 जुलै : भ्रष्टाचाराने बरबटलेली महापालिका अशी ख्याती असणारी कल्याण डोंबिवली महापालिका पुम्हा एकदा याच मुद्द्यावरून चर्चेत आली आहे. महापालिका प्रशासनात प्रभाग अधिकारी पदावर स्वाती गरुड यांना 25 हजारांची लाच घेताना ठाणे अँटी करप्शनने रंगेहात पकडले आहे. लाच घेताना पकडण्यात आलेल्या या महापालिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.   संबंधित तक्रारदाराने घराच्या दुरुस्तीच्या …

जूनमध्येच ठाणे जिल्ह्यात तब्बल 5 हजार मिलिमीटर पाऊस

 केतन बेटावदकर कल्याण दि.1 जुलै: ठाणे जिल्ह्यातील यंदाचा पावसाळा बहुधा रेकॉर्डब्रेक ठरण्याची चिन्ह सद्यस्थितीवरून दिसत असून पहिल्याच महिन्यात ठाणे जिल्ह्यात तब्बल 5 हजार मिलिमीटर पाऊस झाला आहे. जून महिन्याच्या सरासरीपेक्षा हा तब्बल 2 हजार मिलिमीटर अधिक पाऊस असून हा एक नवा विक्रम आहे.   यंदाच्या जूनमध्ये 7 तारखेचा मुहूर्त हुकवलेल्या पावसाने जिल्ह्यात अधून मधून हजेरी …

कल्याणच्या लक्ष्मी मार्केटसमोरील रस्त्यावर पुन्हा एकदा पडले भलेमोठे भगदाड

कल्याण दि.30 जून : कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकातून मोहम्मद अली चौकाकडे जाणारा रस्ता पुन्हा एकदा खचला आहे. लक्ष्मी मार्केटसमोर बांधण्यात आलेल्या या पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याला भलेमोठे भगदाड पडले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही याचठिकाणी अशाच प्रकारची घटना घडली होती. येथील शिवाजी चौकातून मोहम्मद अली चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे गेल्याच वर्षी रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले …

कल्याण स्टेशनजवळ एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून घसरले; रेल्वे वाहतूक विस्कळीत

कल्याण दि.30 जून : मुंबईकडे येणाऱ्या हजरत निजामुद्दीन एरनाकुलम मंगला एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान दिड तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वे इंजिन पुन्हा रुळावर आणण्यात आले.   आज दुपारी 2 वाजून 20 मिनिटांच्या  दरम्यान हा प्रकार घडला. मुंबईकडे येणारी मंगला एक्स्प्रेस कल्याण स्थानकाकडे येत होती. त्यावेळी रेल्वे ट्रॅक बदलत असताना …

डोंबिवलीत संतप्त प्रवाशांनी अडवून धरली वाहतूक

डोंबिवली दि.29 जून : डोंबिवलीमध्ये प्रवाशी आणि रिक्षाचालकांमध्ये चांगलाच वाद पेटला. भाडे घेण्याच्या कारणावरून संतापलेल्या प्रवाशांनी केळकर रोडवर अर्धा तास वाहतूक अडवून ठेवली. डोंबिवलीमध्ये चाकरमान्यांना घरापर्यंत जाण्यासाठी सर्वात मोठा पर्याय हा रिक्षा असतो. पण, मनमानी कारभार आणि रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे प्रवाशांना अनेकदा फटका बसतो. मात्र आज प्रवाशांचा संतापाचा उद्रेक झाला. भाडे न घेण्याच्या कारणावरून प्रवाशी आणि …

महापालिकेचा आपत्कालीन कक्ष डेब्रीजच्या कॉल्सने हैराण

    केतन बेटावदकर कल्याण दि.29 जून : कल्याण डोंबिवली महापालिकेने सुरू केलेला आपत्कालीन कक्ष सध्या भलत्याच कारणाने हैराण झाला आहे. पावसाळ्याचा विचार करता त्या अनुषंगाने या कक्षाला फोन कॉल्स येणे अभिप्रेत असताना त्याऐवजी केवळ डेब्रीज उचलण्याच्या कॉल्सची आपत्ती या कक्षावर ओढावली आहे. महापालिकेतर्फे पावसाळ्यात दरवर्षी आपत्कालीन कक्ष स्थापन केला जातो. पावसाळयात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत …