कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पावसामूळे अनेक सखल भागात साचलं पाणी

कल्याण दि.18 जुलै : गेल्या काही दिवसांपासून संततधार बरसणाऱ्या पावसानं कालपासून कल्याण-डोंबिवलीला झोडपून काढलं असून त्यामुळे शहरांतील सखल भागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून आले. पावसाच्या या जोरदार बॅटींगमुळे कल्याण-डोंबिवलीच्या अनेक भागात पाणीच पाणी झालं असून पालिकेच्या कामाची चांगलीच पोलखोल झाली. कल्याणातील शिवाजी चौक, मोहम्मद अली चौक, अहिल्याबाई चौक, भारताचार्य वैद्य चौक, बेतूरकर पाडा …

कल्याण तालुक्यातील म्हारळ परिसरात घराची भिंत कोसळून २ ठार; ६ जखमी

  कल्याण दि.16 जुलै :   कल्याण तालुक्यातील म्हारळ परिसरात अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळून २ जण ठार तर ६ जण जखमी झाले. रविवारी पहाटे ५ वाजता हे सर्ववजण झोपेत असताना ही दुर्घटना घडली. सैफुद्दीन अल्लाउद्दीन खान (४५) आणि इस्लाम निजामुद्दीन शेख (४५) अशी दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. कल्याणचे तहसिलदार अमित सानप यांनी या वृत्ताला दुजोरा …

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या तरुणाला अटक

कल्याण दि.15 जुलै : परदेशातील मोठमोठया कंपन्यांमध्ये नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद खान असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा बिहार राज्याचा रहिवासी आहे. मोहम्मदकडून पोलिसांनी आतापर्यंत 26 पासपोर्ट आणि अनेक खोटी नियुक्ती पत्रं हस्तगत केली आहेत. प्रेरणा कन्सल्टन्सी कंपनीच्या नावाने एक व्यक्ती बनावट कागदपत्रं तयार करून तरुणांची …

टिटवाळा येथील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला

टिटवाळा दि.14 जुलै: कल्याण तालुक्यातील काळू नदीवर असणाऱ्या रूंदे गावाजवळील 2 पुल पाण्याखाली गेल्याने गावांचा टिटवाळा शहराशी संपर्क तुटला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुलावरील पाणी ओसरण्याच्या प्रतिक्षेत असणारे नागरिक दिसत आहेत. सकाळपासून नदीच्या उगमस्थानी कोसळणाऱ्या पावसामुळे टिटवाळा जवळील काळू नदीवरील रूंदे गावा शेजारील पुल पाण्याखाली गेला आहे. यामुळे लगतच्या रूंदे, आंबिवली, फळेगांव, मढ, हाल, उशीद,भोंगळ …

समृद्धी महामार्गाबाबत आपण शेतकऱ्यांच्या पाठिशी- खासदार कपिल पाटील

कल्याण, दि. 14 जुलै : समृद्धी महामार्गाच्या विरोधात आपण नाही. मात्र, महामार्गासाठी भूसंपादनाच्या प्रश्नात आपण शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच बैठक घेण्यात आल्याची माहिती खासदार कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. खासदारपदाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी कल्याणमध्ये खासदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते …

महापालिकेतील मुख्य सभागृहाचे छत कोसळले; सुदैवाने कोणाला दुखापत नाही

कल्याण दि.12 जुलै: कल्याण डोंबिवली महापालिकेतील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सभागृहाचे संपूर्ण छत कोसळण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी सभागृहाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.     या सभागृहाचे उद्घाटन होऊन आज बरोबर 15 वर्षे पूर्ण होत असतानाच हा प्रकार घडल्याने महापालिका इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही …

तुकाराम मुंढेंना इकडे आयुक्त म्हणून आणण्यासाठी प्रयत्नशील – गणपत गायकवाड

कल्याण दि.10 जुलै : कल्याण-डोंबिवली महापालिकेत यापूर्वी यु. पी.एस. मदान, टी. चंद्रशेखर, श्रीकांत सिंह यांच्यासारखे चांगले आयुक्त लाभले होते. मात्र आता तसे आयुक्त येत नसल्याने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुकाराम मुंढे यांना आयुक्त म्हणून द्या, अशी मागणी केल्याची माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी दिली आहे. कल्याण डोंबिवली पत्रकार संघातर्फे आयोजित ‘दिलखुलास संवाद’ कार्यक्रमात ते …

शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ – अजित पवार यांचे टिकास्त्र

कल्याण दि.9 जुलै: ‘शिवसेनेची अवस्था म्हणजे दोन तोंडाच्या गांडुळासारखी झाली आहे. दिवसा मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकत्र बसून निर्णय घ्यायचे आणि संध्याकाळी त्याच निर्णयाला विरोध करायचा. अशा धरसोड वृत्तीमुळेच १९५ आमदारांचा पाठिंबा असूनही ३० वर्षातलं हे सगळ्यात दुर्बल सरकार आहे.’ अशी टीका अजित पवार यांनी केली. कल्याणमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सेना-भाजपवर टीकास्त्र …

स्वाईन फ्ल्यू’बाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये – महापौर देवळेकर

      कल्याण दि.7 जुलै : ठाणे जिल्ह्यात वेगाने फैलावणाऱ्या ‘स्वाईन फ्ल्यू’बाबत नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केले आहे. स्वाईन फ्ल्यू तसेच इतर साथरोगांसंदर्भात महापौर देवळेकर आणि सेनेच्या नगरसेवकांन महापालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.   आतापर्यंत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 753 संशयित रुग्णांची …

नेवाळीच्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण – आमदार गणपत गायकवाड

  डोंबिवली दि.6 जुलै : नेवाळीतील आंदोलकांना पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण केली जात असल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. तसेच या आंदोलकांना सोडवण्यासाठी वेळप्रसंगी आपल्या पदाचा त्याग करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात आयोजित आगरी, कुणबी, कोळी समाजाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. नेवाळी इथं नौदलानं सुरू केलेल्या १६७६ एकर …