कल्याण शहर भाजप उपाध्यक्षासह कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला

कल्याण दि.16 एप्रिल : कल्याणातील भाजप शहर उपाध्यक्ष शत्रुघ्न भोईर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर काल रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. काल रात्री 11 ते 12 च्या दरम्यान 10-12 अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांसह शत्रुघ्न भोईर यांच्या घरावर हल्ला केल्याची माहिती शत्रुघ्न भोईर यांनी …

12 लाखांच्या लाचप्रकरणी 2 आयएएस अधिकारी अटकेत

ठाणे दि.16 एप्रिल: ठाण्यात आदिवासी विकास खात्याचे उपायुक्त किरण माळी यांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे यांनी 12 लाखांची लाच मागितली होती. आंब्याच्या पेटीमधून 12 लाख रुपयांची लाच स्वीकारताना माळींना अटक करण्यात आली आहे. तसंच आयएएस अधिकारी मिलिंद गवादेंनाही अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाने …

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

कल्याण दि.10 एप्रिल: कल्याणजवळील आंबिवलीच्या इराणी वस्तीत फरार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात 25 महिलांसह चार जणाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंबिवली येथील इराणी वस्ती गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात राहिली आहे. याठिकाणाहून पोलिसांनी शेकडो चैनस्नेचर्स गजाआड केले आहेत. तसेच यापूर्वीही …

काँग्रेस नेते मनोज म्हात्रे हत्याप्रकरणातील सूत्रधाराला अटक

ठाणे दि.30 मार्च : भिवंडी महापालिकेतील सभागृहनेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मुख्य सूत्रधारासह 5 जणांना अटक केली. ठाणे पोलीसांच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी रात्री महाबळेश्वरजवळील गावातून या सर्वांना ताब्यात घेतले. गेल्या महिन्यात काँग्रेस नेते आणि सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची 5 ते 6 हल्लेखोरांनी अतिशय निर्दयपणे हत्या केली होती. या हत्येने …

अनेकांना लाखोंचा गंडा घालणारी ‘लेडी 420’ अखेर अटकेत

कल्याण दि.20 मार्च : स्वतः उच्च न्यायालयात वकील असल्याचे भासवून ज्वेलर्स व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या महिलेला तिच्या सासुनेच बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. याहून धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने फसवून 2 लग्न केली असून सासरच्यांकडील सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याप्रकरणी पोलीस तिच्या शोधात होते. या महिलेला अटक झाल्याचे समजताच तिच्याकडून फसवणूक झालेल्या अनेक व्यक्ती आणि प्रकार …

रिक्षाचालकाने महिला होमगार्डला मारहाण करून नाल्यात ढकलले

  डोंबिवली दि.19 मार्च : कल्याण डोंबिवलीतील रिक्षा चालकांची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच असून डोंबिवलीतील महिला होमगार्डला एका मुजोर रिक्षा चालकाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार डोंबिवलीत घडला आहे. विशेष म्हणजे रामनगर पोलीस ठाण्यासमोर हा प्रकार घडला असून संबंधित रिक्षाचालकाने नंतर या महिलेला रिक्षेत टाकून नाल्यातही ढकलून दिले. त्यामुळे या मुजोर रिक्षाचालकांना पोलीस किंवा कायद्याचा कोणताही धाक …

20 लाखांच्या जुन्या नोटा महात्मा फुले पोलिसांकडून जप्त

कल्याण दि.14 मार्च : चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याच्या उद्देशाने आलेल्या 4 जणांसह एका व्यापाऱ्याला महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 20 लाख 27 हजार रुपयांच्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. कल्याण पश्चिमेतील लक्ष्मी मार्केट परिसरात काही इसम जुन्या नोटा बदलून देण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस …

घरफोडी करणाऱ्या  2 अट्टल गुन्हेगारांना अटक: 14 गुन्हे उघडकीस

कल्याण दि.14 मार्च : कल्याण परिसरात घरफोडी करणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून घरफोडीचे तब्बल 14 गुन्हे उघडकीस आले आहेत. तर सुमारे 12 लाख रुपये किमतीचे 429 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले आहेत. आशिष उर्फ आशु राजोलिया, विकास उर्फ विक्की बेनवल दोघेही मूळचे राहणारे उत्तरप्रदेश (सध्या उल्हासनगर, बदलापूर) …

महापालिकेत नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये पुन्हा एकदा राडा

कल्याण दि.10 मार्च : नगरसेवकांचे समर्थक आपसात भिडल्याने कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे या दोन नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये असाच प्रकार घडल्याने महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.   कल्याण डोंबिवली महापालिकेची आज तहकूब महासभा होती. तसेच काल ई प्रभाग क्षेत्र कार्यालयात पाणीप्रश्नावरून लोकप्रतिनिधी आणि उपअभियंता यांच्यातील वादाच्या …

कल्याणात सेना नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला

कल्याण दि.9 मार्च : कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेना नगरसेविका माधुरी काळे यांचे पती प्रशांत काळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल रात्री 12 च्या सुमारास कल्याण पूर्वेत हा प्रकार घडला असून सेना नगरसेविका माधुरी काळे यांनी सेनेच्याच पदाधिकाऱ्याने हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. माधुरी आणि प्रशांत काळे हे काल रात्री घरी …