बेकायदेशीर मालवाहतुकीवरील कारवाईच्या रागातून रेल्वे अधिकाऱ्यावर हल्ला

डोंबिवली दि.17 मे:  रेल्वेचे कल्याण स्टेशनचे मुख्य वाणिज्य निरीक्षक संदीप तिवारी यांचेवर बुधवारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात लगेज माफियांनी हल्ला केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. संदीप तिवारी असे या रेल्वे अधिकाऱ्याचे नाव असून रेल्वेमध्ये बेकायदेशीरपणे सामान चढवण्यावरून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.   रेल्वेतुन जाणाऱ्या लगेजबाबत तिवारी यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात …

कल्याण रेल्वे स्थानकात एक्सप्रेसमध्ये सापडली 37 लाखांची रोकड

कल्याण दि.11 मे : कल्याण रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या उद्यान एक्सप्रेसमधून आरपीएफ न ३७ लाख रुपये जप्त केले आहेत. बंगलोरहुन मुंबईला येणाऱ्या उद्यान एक्सप्रेसमध्ये टीसीला एका बर्थवर सामान दिसलं मात्र प्रवासी गायब होता. त्याला संशय आला असता त्याने लगेच रेल्वे पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी झडती घेतली असता त्या सामानात कीबॉक्स आढळून आला. तो उघडला तेव्हा …

फ्लॅटचे काम घेण्याच्या वादातून ठाकुर्लीत गोळीबार ; एकाचा मृत्यू

डोंबिवली दि.9।मे : क्षुल्लक वादातून झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याच्या प्रकाराने डोंबिवली शहर हादरले. ठाकुर्लीच्या चोळे गावातील बालाजी नगर परिसरात आज दुपारी हा प्रकार घडला. या गोळीबाराचे नेमके कारण समजू शकलेले नसले तरी फ्लॅटच्या इंटिरियर डेकोरेशनचे काम करण्यावरून हा गोळीबार झाल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे. चोळे गावातील बालाजी नगर परिसरात देवी शिवामृत नावाची इमारत …

मैत्रीच्या नात्याला काळीमा; आपल्याच मित्राच्या पत्नीवर नराधमांचा बलात्कार

  उल्हासनगर दि.29 एप्रिल : जगात मैत्रीचे नाते हे सर्वश्रेष्ठ समजले जाते. जिथे रक्ताची नाती संपतात तिथे मैत्रीचे पवित्र नातं सुरू होते असं म्हटलं जातं. मात्र कल्याणजवळील द्वारली गावात मैत्रीच्या या नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. पैसे देण्याच्या बहाण्याने आपल्या मित्राच्या पत्नीला घरी बोलावून तिच्यावर दोघं जणांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर …

दागिने लंपास करून चोरट्यांनी जाळले कपाट; टळली मोठी दुर्घटना

कल्याण दि.29 एप्रिल: बंद असणारे घर हेरून चोरट्यांनी पैसे आणि दागिन्यांवर तर डल्ला मारलाच पण जाता जाता घरातील कपाटही पेटवून दिल्याची विचित्र घटना कल्याण पश्चिमेतील एका चाळीत घडली.   येथील आधारवाडीजवळील महाराष्ट्र नगर चाळीत राठोड कुटुंबिय राहतात. काल सकाळी राजू राठोड हे भाचीच्या लग्नाच्या कामानिमित्त कर्नाटकला गेले होते. त्यांची पत्नी सुनिता राठोड या कळव्याला आपल्या …

अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह तिच्या पतीवर भिवंडीत गुन्हा दाखल

भिवंडी दि.27 एप्रिल :  सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रासह ३ जणांविरोधात २४ लाखांचा अपहार  केल्याचा गुन्हा कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याने सिनेजगतात एकच खळबळ माजली आहे. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, दर्शित शाह, उदय कोठारी, वेदांत विकास बल्ली अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. मुंबईत राहणारे रवी मोहनलाल भलोटीया (५९) रा. …

उल्हासनगरात वाईन शॉपवर गोळीबार; खंडणीखोर सुरेश पुजारी टोळी पुन्हा सक्रीय?

  उल्हासनगर दि. 27 एप्रिल : कॅम्प ५ भागातील मुकेश वाईन शॉपवर आज दुपारी दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हा गोळीबार खंडणीसाठी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सुरेश पुजारी टोळीशी या गोळीबाराचा संबंध जोडला जात असून त्यामुळं पुजारी टोळी उल्हासनगरात पुन्हा सक्रीय झाल्याचं पाहायला मिळतंय. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याकडून अंबरनाथकडे जाताना कॅम्प ५ मध्ये बाजारपेठ असून …

महागडे मोबाईल आणि बाईक चोरणारे 2 अट्टल इराणी आरोपी गजाआड

कल्याण दि.25 एप्रिल : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या यादीत टॉप 20 वॉन्टेड आरोपी असणाऱ्या दोघा अट्टल गुन्हेगारांना कल्याण पोलीस उपयुक्तांच्या अँटी चेन स्नॅचिंग स्कॉडने मुसक्या आवळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी इराणी वस्तीत पोलिसांवर झालेल्या हल्ल्यातील एका आरोपीचाही यात समावेश आहे. मम्मू उर्फ वसीम इराणी आणि सैय्यद इराणी अशी या दोघा अट्टल गुन्हेगारांची नावे आहेत. हे दोघेही ठाणे …

उल्हासनगरात ‘स्पेशल 26’; सेल्स टॅक्स ऑफिसर बनून आलेले भामटे गजाआड

उल्हासनगर दि.24 एप्रिल : काही वर्षांपूर्वी आलेला बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारचा ‘स्पेशल 26’ हा सिनेमा आपल्या सर्वांच्या चांगलाच स्मरणात आहे. सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून काही ठगांनी त्यावेळी दिल्लीत धुमाकूळ घातला होता. या घटनेला साजेसा प्रकार उल्हासनगरात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. सेल्स टॅक्स अधिकारी बनून रेड मारण्यासाठी आलेल्या 5 भामटे दुकानदाराच्या जागरूकतेमुळे गजाआड झाले आहेत. उल्हासनगर …

मुंब्रा परिसरातून 3 संशयित दहशतवादी एटीएसच्या ताब्यात

मुंबई दि.20 एप्रिल : मुंबई, बिजनौर आणि लुधियानातून पाच दहशतवाद्यांना, तर चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. पाच राज्यांच्या पोलिसांच्या मदतीनं एटीएसनं ही कारवाई केली. ठाण्यातील मुंब्रा भागातून नाजिम शमशाद अहमद नावाच्या एका 26 वर्षीय दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. नाजिम हा मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनौरचा रहिवासी आहे. मात्र 2014 पासून तो मुंब्य्राच्या देवरी पाडा …