भाजप नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या व्यक्तीला पालघरमध्ये अटक

  पालघर दि.25 जानेवारी : गुजरातमध्ये 2002मध्ये झालेल्या जातीय हिंसाचाराचा बदला घेण्यासाठी भाजप नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली गुजरात एटीएसने पालघरमधून एका व्यक्तीला अटक केली आहे. अबरार पठाण(48) असे या व्यक्तीचे नाव असून त्याला अटक करून अहमदाबादला नेण्यात आले. एटीएसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहशत माजवण्यासाठी हत्यारं पुरविण्याच्या गुन्ह्यासाठी पठाण गेल्या 13 वर्षांपासून फरार होता. तर त्याच्या …

‘आयसिस’शी संपर्कात असल्याच्या संशयावरून मुंब्रा येथून तरुण ताब्यात

ठाणे दि.22 जानेवारी : आयसिस या दहशवादी संघटना मुंबईपर्यंत पोहोचले की काय अशी शंका निर्माण झाली आहे. कारण मुंबईला लागून असलेल्या ठाण्याच्या मुंब्रा भागातून एक संशयित तरुणाला आयसिस संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक म्हणजेच एटीएसने ही संयुक्तपणे कारवाई केली. ठाण्यात अटक करण्यात आलेला …

सीसीटिव्हीमुळे टाळू शकतो होणारे गुन्हे – पोलीस उपायुक्त संजय जाधव

कल्याण दि.16 जानेवारी : 10 माणसे जेवढे काम करू शकत नाहीत, तेवढे काम 1 सीसीटिव्ही करू शकतो. त्यामुळे रहिवासी किंवा व्यावसायिक ठिकाणी सीसीटिव्ही बसविण्याची आग्रही सूचना कल्याण परिमंडळचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी केली. येथील अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या बैठकीत बोलताना त्यांनी ही सूचना केली. शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबत विविध क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी पोलीस …

मद्यपी तरुणांची रिक्षाचालकाला बेदम मारहाण; रिक्षाचालकाचा मृत्यू

कल्याण दि.15 जानेवारी : रस्त्यावरून पुढे जाण्यास साईड न दिल्याबाबत जाब विचारणाऱ्या रिक्षा चालकाला मद्यपी तरुणांनी केलेल्या बेदम मारहाणीत त्या रिक्षावाल्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी कोणतेही धागेदोरे नसताना 4 तरुणांना अटक केली आहे. यापैकी एक आरोपी अल्पवयीन असून त्याची रवानगी भिवंडी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. नरेश कर्णिक असे या रिक्षा चालकाचे …

चड्डी-बनियन गँगने एकाच वेळी फोडली 3 घरे; हल्ल्यात वॉचमन गंभीर जखमी

कल्याण दि. 7 जानेवारी : काही महिन्यांपूर्वी सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या चड्डी बनियन गॅंगने कल्याणात एकाच वेळी 3 घरफोड्या करून पोलिसांना मोठे आवाहन दिले आहे. एवढेच नाही तर या सोसायटीच्या वॉचमनलाही या टोळीने बेदम मारहाण केली असून त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. नेतीवली पत्रीपुलाजवळील सर्वोदय सोसायटीत गुरुवारी मध्यरात्री 3 ते पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान …

अंबरनाथच्या शिवसेना नगरसेवकाची हत्या…

अंबरनाथ दि.25 डिसेंबर : अंबरनाथ येथील वार्ड क्रमांक ५ चे शिवसेना नगरसेवक पप्पू गुंजाळ यांच्यावर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घराजवळ प्राणघातक हल्ला करण्यात आला. कल्याणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. पूर्व वैमान्यातून हा हल्ला झाला असण्याचा प्राथमिक अंदाज असून त्यामुळे अंबरनाथमध्ये तणावाचे वातावरण आहे. गुंजाळ हे सकाळच्या वेळेस घरातून घरून कार्यालयाकडे जात …

लाच घेतल्याप्रकरणी पोलीसाला 6 महिन्यांचा तुरुंगवास…

ठाणे दि.11 डिसेंबर : लाच घेतल्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या खटल्यात दोषी आढळलेल्या पोलीस हवालदाराला 6 महिने तुरुंगवास आणि 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ठाणे येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम.एम. वलीमहमद यांनी ही शिक्षा ठोठावली. नवी मुंबईच्या नेरूळ पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस हवालदार केशव विक्रम पाटील यांना 12 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. चै …

महापालिकेच्या उपभियंत्याच्या आत्महत्येने कल्याणात खळबळ…

कल्याण दि.8 डिसेंबर : कल्याण डोंबिवली महापालिकेतील उपअभियंता दत्तात्रय मस्तुद यांनी आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याने कल्याणात खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. मस्तुद यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी आपल्या आजाराला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा …